तेलंगणमध्ये पॅसेंजर- स्कूलबसच्या धडकेत २० विद्यार्थी ठार

By Admin | Updated: July 24, 2014 18:22 IST2014-07-24T10:25:08+5:302014-07-24T18:22:30+5:30

तेलंगणमधील कामा रेड्डी स्थानकाजवळ ट्रेनची स्कूलबसला धडक बसून झालेल्या अपघातात २० जण ठार तर १६ जण जखमी झाले आहेत.

Passengers in Telangana - 20 students killed in school bus crash | तेलंगणमध्ये पॅसेंजर- स्कूलबसच्या धडकेत २० विद्यार्थी ठार

तेलंगणमध्ये पॅसेंजर- स्कूलबसच्या धडकेत २० विद्यार्थी ठार

>ऑनलाइन टीम
हैदराबाद, दि. २४ - तेलंगणमधील मेडक जिल्ह्यातील कामा रेड्डी स्थानकाजवळ एक्स्प्रेस ट्रेनची स्कूलबसला धडक बसून झालेल्या अपघातात २० ठार तर १६ जण जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह वाहनचालकाचाही समावेश आहे. सर्व मृत विद्यार्थी ककातिया शाळेतील आहेत.
मेडक जिल्ह्यातील मसईपेठ गावाजवळ एक स्कूलबस रेल्वे रुळ पार करत असताना नांदेड-हैदराबाद पॅसेंजरची बसला जोरदार धडक बसली. यावेळी बसमध्ये ४० ते ५० विद्यार्थी अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातात २०जण ठार झाले असून १६ जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Passengers in Telangana - 20 students killed in school bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.