पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:27 IST2025-07-15T06:27:17+5:302025-07-15T06:27:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी हरयाणाच्या राज्यपालपदी प्रो. असीमकुमार घोष, तर गोव्याचे राज्यपाल ...

Pashupati Raju is the Governor of Goa and Asim Kumar Ghosh is the Governor of Haryana | पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल

पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी हरयाणाच्या राज्यपालपदी प्रो. असीमकुमार घोष, तर गोव्याचे राज्यपाल म्हणून पशुपती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती केली. यशिवाय, लड्डाखच्या नायब राज्यपालपदी कविंदर गुप्ता यांना नियुक्त करण्यात आले आहे.

 घोष हे अनुभवी नेते व शिक्षणतज्ज्ञ आहेत. प. बंगाल भाजपचे ते माजी अध्यक्ष आहेत. राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. १९९१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर १९९९ ते २००२ पर्यंत ते प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते.

अशोक गजपती राजू यांनी माजी केंद्रीय मंत्री असून, कविंदर गुप्ता हे जम्मू-काश्मीरमधील भाजपचे मोठे नेते आहेत. लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. 

Web Title: Pashupati Raju is the Governor of Goa and Asim Kumar Ghosh is the Governor of Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा