आव्हाणे ग्रा.पं.त रंगली पं.स.च्या अधिकार्‍यांची पार्टी

By Admin | Updated: March 6, 2016 23:38 IST2016-03-06T23:38:26+5:302016-03-06T23:38:26+5:30

जळगाव: पंचायत समितीच्या काही अधिकार्‍यांनी तालुक्यातील आव्हाणे ग्रामपंचायतीत रविवारी रात्री मटन व दारुची मनसोक्तपणे पार्टी झोडपल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार्टी रंगल्याची चर्चा गावभर झाल्यानंतर या अधिकार्‍यांनी रात्री दहा वाजता घाईगडबडीत कार्यक्रम आटोपता घेत तेथून पळ काढला. पंचायत समितीच्या सभापतींकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने त्यांचे पती सुनील मोरे यांनी अधिकार्‍यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर या सर्वांची जेवणाची व दारुची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली होती. संध्याकाळी आठ वाजेपासून सुरु झालेला हा कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत सुरु होता. या रंगीतसंगीत पार्टीचे अनेकांनी व्हीडीओ व छायाचित्रण केले आहे.

Party of Rangoli PNS officials in the GRP | आव्हाणे ग्रा.पं.त रंगली पं.स.च्या अधिकार्‍यांची पार्टी

आव्हाणे ग्रा.पं.त रंगली पं.स.च्या अधिकार्‍यांची पार्टी

गाव: पंचायत समितीच्या काही अधिकार्‍यांनी तालुक्यातील आव्हाणे ग्रामपंचायतीत रविवारी रात्री मटन व दारुची मनसोक्तपणे पार्टी झोडपल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार्टी रंगल्याची चर्चा गावभर झाल्यानंतर या अधिकार्‍यांनी रात्री दहा वाजता घाईगडबडीत कार्यक्रम आटोपता घेत तेथून पळ काढला. पंचायत समितीच्या सभापतींकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने त्यांचे पती सुनील मोरे यांनी अधिकार्‍यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर या सर्वांची जेवणाची व दारुची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली होती. संध्याकाळी आठ वाजेपासून सुरु झालेला हा कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत सुरु होता. या रंगीतसंगीत पार्टीचे अनेकांनी व्हीडीओ व छायाचित्रण केले आहे.

Web Title: Party of Rangoli PNS officials in the GRP