शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election Results: 'आणीबाणी लागू करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 07:44 IST

काँग्रेसच्या टीकेला भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. राज्यपालांनी भाजपाचे विधीमंडळ नेते येडियुरप्पा यांना सत्ता स्थापन करण्याचं आमंत्रण दिल्यानं काँग्रेसनं काल रात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपाला संधी दिल्यानं काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राज्यपालांवर तोंडसुख घेतलं. यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं. ज्यांना देशात आणीबाणी लागू केली, त्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत, अशा शब्दांमध्ये प्रसाद काँग्रेसवर बरसले.भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं त्यांना सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं जाऊ नये, अशी भूमिका काँग्रेस आणि जेडीएसनं घेतली होती. मात्र राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानं काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. काँग्रेसच्या या टीकेला भाजपानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. '6 डिसेंबर 1992 नंतर काँग्रेस पक्षानं अनेक राज्यांमधील भाजपाची सरकारं बरखास्त केली होती. बाबरी मशीद पाडण्याची घटना उत्तर प्रदेशात घडली होती. मात्र यावरुन मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमधील भाजपा सरकारं पाडण्यात आली होती. काँग्रेसनं राज्यांमध्ये घटनाबाह्य पद्धतीनं आणीबाणी लागू केली होती. घटना उद्ध्वस्त करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत,' अशा शब्दांमध्ये प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं. राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या पक्षाला आमंत्रण द्यायचं, त्यावर आम्ही काहीही भाष्य करु शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. 'निवडणूक पूर्व युती करुन सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षांना सत्ता स्थापनेसाठी पहिल्यांदा संधी दिली जाते. त्यानंतर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला प्राधान्य दिलं जातं आणि सर्वात शेवटी निवडणुकीनंतर एकत्र येणाऱ्या पक्षांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं जातं,' असंही प्रसाद यांनी म्हटलं.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाcongressकाँग्रेस