पर्रीकरांनी सांगितले राहुल गांधींसोबतच्या बैठकीत काय झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 18:14 IST2019-01-30T18:01:19+5:302019-01-30T18:14:09+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यावर असताना अचानक विधानसभेमध्ये जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली.

Parrikar said what happened in a meeting with Rahul Gandhi ... | पर्रीकरांनी सांगितले राहुल गांधींसोबतच्या बैठकीत काय झाले...

पर्रीकरांनी सांगितले राहुल गांधींसोबतच्या बैठकीत काय झाले...

पणजी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यावर असताना अचानक विधानसभेमध्ये जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. यावेळी त्य़ांनी या 5 मिनिटांच्या बैठकीत राफेल करारावर चर्चा झाल्याचे सांगितले होते. मात्र, पर्रीकरांनी राहुल गांधी खोटे बोलत असल्याचे सांगत हे वृत्त फेटाळले आहे. 


बुधवारी राहुल गांधी यांनी दिल्ली येथील यूथ काँग्रेसच्या रॅलीमध्ये राफेल करारावेळी पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्र्याला विचारले नव्हते, असे पर्रीकर यांनी स्वत: सांगितल्याचा आरोप केला होता. यावर पर्रीकर यांनी या पाच मिनिटांच्या बैठकीत राफेल करारावर काहीच बोलने झाले नसल्याचे सांगत राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा आरोप केला. 


पर्रीकर यांनी या संबंधात राहुल यांना पत्रही लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधी हे राजकीय लाभ मिळविण्यासाठीच आपल्याला भेटायला आल्याचा आरोप केला आहे. या पाच मिनिटांच्या बैठकीत नाही तुम्ही राफेल मुद्द्यावर बोलला नाही यासंबंधी चर्चा केली, असे म्हटले आहे. 

Web Title: Parrikar said what happened in a meeting with Rahul Gandhi ...