parliaments monsoon session may be cut short as covid 19 cases among mps rise says report | कोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट

कोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट

कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. 30 खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती संसदेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांनी दिली. सध्या देशात 53 लाखांहून अधिक कोरोनाचे प्रकरणे नोंदली गेली आहेत. 14 सप्टेंबर रोजी सहा महिन्यांत पहिल्यांदाच संसद अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 1 ऑक्टोबरपर्यंत काम करायचे होते, पण संसदेच्या कामकाजाचा कालावधी एक आठवड्यानं कमी केला जाऊ शकतो, असे दोन्ही अधिका-यांनी सांगितले.

संसद अधिवेशनाच्या कार्यवाहीत सहभागी असलेल्या दोन अधिका-यांपैकी एकाने सांगितले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून कोरोना पॉझिटिव्ह खासदारांची संख्या वाढली आहे, त्यामुळे सरकार अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा विचार करीत आहे. शनिवारपासून अधिवेशनासाठी संसदेत प्रवेश करणा-या पत्रकारांना सरकारने डेली अँटीजन टेस्टदेखील अनिवार्य केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या सचिवांनी कामकाज कमी करण्याशी संबंधित प्रश्नांना कोणतेही उत्तर दिले नाही. कोरोना संसर्ग झालेल्या खासदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात रस्ते आणि वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरींचा समावेश आहे.

नायडू यांच्या राज्यसभा सदस्यांना सुरक्षा उपायांचे पालन करण्याच्या सूचना
दुसरीकडे राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सांगितले की, परीक्षा हॉलमध्ये चिठ्ठ्या आदान-प्रदान करण्यास परवानगी नाही. परंतु कोरोना सुरक्षेच्या उपाययोजनांच्या दृष्टीने वरिष्ठ सभासद सदस्य एकमेकांशी संपर्क साधू शकतात.
सभा सुरू झाल्यावर सभागृहात बसलेल्या अधिका-यांकडे कोणत्याही स्पष्टीकरणासाठी येऊ नये. तसेच त्यांनी एकमेकांच्या सदस्यांच्या जागेवर जाऊ नये, असा सल्ला नायडू यांनी वरच्या सभागृहातील सदस्यांना दिला. कोणतीही समस्या आवश्यक असल्यास आपण आपली चिठ्ठी पाठवू शकता.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी, पत्रकार यांची अँटीजन टेस्ट अनिवार्य
खासदारांना कोरोना विषाणूची लागण होण्याच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर नवीन प्रोटोकॉलनुसार संसद आवारात प्रवेश करणारे सर्व कर्मचारी आणि पत्रकारांसाठी दररोज अँटीजन तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. एका ज्येष्ठ संसद सदस्यानं सांगितले की, दोन्ही सभागृहाचे सदस्य विशिष्ट अंतरानंतर आरटी-पीसीआर तपासणी करीत आहेत. खासदार आरटी-पीसीआर तपासणी खासदार कितीही वेळा करू शकतात.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: parliaments monsoon session may be cut short as covid 19 cases among mps rise says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.