शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड घडणार? BJPने खासदारांसाठी जारी केले व्हीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 16:03 IST

भाजपाने आपल्या सर्व सदस्यांसाठी व्हीप जारी करत 10 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Parliament Session: संसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार होते, मात्र अधिवेशनाचा कालावधी एका दिवसासाठी वाढवण्यात आला. आता अधिवेशन 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या शेवटच्या दिवशी काहीतरी मोठी घडामोड घडू शकते, असे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, भाजपने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी करुन 10 फेब्रुवारी रोजी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या सर्व सदस्यांना उद्या, म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दीस काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो. भाजपचे राज्यसभेतील मुख्य व्हीप लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी पक्षाच्या खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे.

'खासदारांनी दिवसभर सभागृहात हजर राहावे'लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपच्या सर्व राज्यसभा खासदारांना सूचित करण्यात येते की, शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यसभेत काही अत्यंत महत्त्वाचे विधायी कामकाज होणार आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व सदस्यांनी शनिवारी दिवसभर सभागृहात उपस्थित राहून सरकारला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सरकारे सादर केली 'श्वेतपत्रिका'दरम्यान, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची चिरफाड करणारी ‘श्वेतपत्रिका’ केंद्र सरकारने लोकसभेत सादर केली. यूपीए सरकारच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटांवर NDA सरकारने यशस्वीरीत्या मात केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. यूपीए सरकारला वारशात धडधाकट आणि मोठ्या सुधारणांसाठी सज्ज झालेली अर्थव्यवस्था लाभूनही 2004 ते 2014 या दहा वर्षांत अर्थव्यवस्था अनुत्पादक बनल्यामुळे देशाचा आर्थिक पाया कमकुवत झाला, असा आरोप त्यात करण्यात आला.  त्यानंतर एनडीए सरकारने विविध आव्हानांचा सामना करीत त्यावर कसा विजय मिळविला, याचाही विस्तृत तपशील या ‘श्वेतपत्रिके’त दिला आहे. आज आणि उद्या यावर चर्चा होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस