संसदेचे अधिवेशन ४ जूनपासून
By Admin | Updated: May 30, 2014 02:42 IST2014-05-30T02:41:53+5:302014-05-30T02:42:15+5:30
सोळाव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या ४ जूनपासून सुरू होणार असून ११ जूनपर्यंत चालणार आहे़ केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यासाठी जुलैमध्ये पुन्हा अधिवेशन बोलविण्यात येणार आहे़

संसदेचे अधिवेशन ४ जूनपासून
नवी दिल्ली : सोळाव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या ४ जूनपासून सुरू होणार असून ११ जूनपर्यंत चालणार आहे़ केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यासाठी जुलैमध्ये पुन्हा अधिवेशन बोलविण्यात येणार आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाची माहिती संसदीय कामकाजमंत्री एम़ वेंकय्या नायडू यांनी पत्रकारांना दिली़ १६ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन ४ जून रोजी सुरू होईल़ ४ व ५ जूनला लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडेल़ ६ जूनला लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल़ ७ व ८ जूनला शनिवार व रविवार असल्याने सभागृहाला सुटी असेल़ ९ जूनला राष्ट्रपतींचे संयुक्त सभागृहात अभिभाषण होईल़१० व ११ जूनला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन केले जाईल आणि शेवटी पंतप्रधान दोन्ही सभागृहांत आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील़ लोकसभेचे कामकाज ४ जूनपासून तर राज्यसभेचे कामकाज ९ जूनपासून सुरू होईल, असे नायडू यांनी सांगितले़ यादरम्यान कुठलेही तत्कालिक विधेयक वा मुद्दा असल्यास त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़