कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब

By देवेश फडके | Published: February 2, 2021 05:24 PM2021-02-02T17:24:29+5:302021-02-02T17:26:20+5:30

विरोधकांनी कृषी कायद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहातील कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. 

parliament session adjourned till tomorrow amid uproar by Opposition over the Farm Laws | कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब

कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब

Next
ठळक मुद्देसंसदेच्या दोन्ही सभागृहात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा तापलाकेंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची विरोधकांची मागणीराज्यसभेत विरोधकांची घोषणाबाजी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नियमित कामकाज सुरू झाले. मात्र, विरोधकांनी कृषी कायद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहातील कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. 

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, यासाठी नोटीस दिली. तर बहुजन समाज पक्षाचे सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी स्थगन प्रस्ताव दिला. मात्र, सभापती वैंकय्या नायडू यांनी उद्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यावर सहमती झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी बाकावरील सदस्य मात्र चर्चेच्या मुद्यावर ठाम राहिले आणि सभात्याग केला. 

ममता बॅनर्जींचा थोडा हटके अवतार; विवाह सोहळ्यात वाद्यांच्या तालावर थिरकल्या

दिवसभरासाठी राज्यसभा तहकूब

शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. तीनवेळा कामकाज तहकूब केल्यानंतर अखेर साडेबारा वाजता राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता उद्या (बुधवारी) सकाळी नऊ वाजता राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

लोकसभेतही काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव

राज्यसभेप्रमाणे लोकसभेतही सदस्यांनी कृषी कायद्याविरोधात शेतकरीआंदोलनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभेतही अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान, काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्यावरून स्थगिती प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी कायद्याचा प्रश्न चांगलाच तापणार असल्याचे पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. 

Web Title: parliament session adjourned till tomorrow amid uproar by Opposition over the Farm Laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.