शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

"माझे आजोबा देशासाठी शहीद झाले, काँग्रेससाठी नाही", पंजाबचे दोन खासदार संसदेत भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 18:53 IST

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान संसदेत आजी-माजी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

Parliament Session 2024 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज(दि.25) जालंधरचे काँग्रेस खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit singh Channi) आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू (RavneetSingh Bittu) यांच्यात जोरदार खडाजंगी पाहयला मिळाली. दोघांमधील वाद इतका पेटला की, सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत थांबवावे लागले. चन्नी यांनी बिट्टूंवर काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप केला, तर बिट्टू यांनी चन्नी यांना सर्वात भ्रष्ट खासदार म्हटले. 

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान चरणजित सिंग चन्नी यांनी रवनीत सिंग बिट्टू यांच्यावर वैयक्तिक टीका केली. 'तुमचे आजोबा सरदार  बेअंत सिंग शहीद झाले खरे. पण ते त्या दिवशी मरण पावले, ज्या दिवशी तुम्ही काँग्रेस सोडून भाजपात गेला', अशी बोचरी टीका चन्नी यांनी केली.

यावर संतापलेल्या बिट्टूंनी जोरदार पटलवार केला. 'माझे आजोबांनी काँग्रेससाठी नाही, तर देशासाठी बलिदान दिले. हे चन्नी इतकं गरिबीबद्दल बोलतात, पण पंजाबमधील सर्वात श्रीमंत आणि सर्वात भ्रष्ट हेच आहेत. त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता नाही सापडली, तर मी माजे नाव बदलेन. 'मी टू'सह अनेक प्रकरणांमध्ये चन्नी यांचे नाव आहे', असा जोरदार पलटवार बिट्टू यांनी केला. 

दोन्ही पक्षांचे सदस्य सभागृहात आमनेसामने बिट्टूंच्या वक्तव्यानंतर चन्नी यांनी बोलण्यास सुरुवात केली असता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. काही खासदार वेलमध्ये आले. विरोधी पक्षाचे खासदारही वेलमध्ये आले. दोन्ही पक्षांचे सदस्य सभागृहात आमनेसामने आल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बिट्टूंनी जे विधान केले, ते खेदजनक असून ते संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात यावे, असी मागणी काँग्रेसने केली. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही नेत्यांच्या विधानांची तपासणी झाली पाहिजे आणि ज्यांनी आक्षेपार्ह विधान केले असेल, ते कारवाईतून काढून टाकले जावे. 

 

टॅग्स :ParliamentसंसदPunjabपंजाबBJPभाजपाcongressकाँग्रेसUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019