शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

संसद घुसखोरी प्रकरण: सहावा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, त्याच्यावर काय आरोप? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 14:56 IST

Parliament Security Breach News: संसदेत घुसखोरी आणि स्मोक कँडल फोडल्याप्रकरणी पोलिसांनी सहाव्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Parliament Security Breach: 13 डिसेंबर रोजी संसदे घुसकोरी केल्याप्रकरणी दिल्लीपोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केली आहे. महेश कुमावत(रा. नागौर, राजस्थान) असे या आरोपीचे नाव आहे. संसदेत घुसखोरी करण्यासाठी महेश गेल्या दोन वर्षांपासून अन्य आरोपींच्या संपर्कात होता. इतकंच नाही तर संसदेत घुसखोरी केल्यानंतर महेशनेच इतर आरोपींचे मोबाईलही नष्ट केले होते.

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी दिल्लीपोलिसांनी यापूर्वीच अन्य पाच आरोपींना अटक केली आहे. सागर शर्मा, मनोरंजन गौडा, अमोल शिंदे, नीलम देवी आणि ललित मोहन झा, अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. सागर शर्मा आणि मनोरंजन गौडाने लोकसभे सभागृहात उडी मारुन गोंधळ घातला होता, यावेळी त्यांनी स्मोक कँडल फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तर, अमोल शिंदे आणि नीलम देवी संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते.

पाचवा आरोपी ललित मोहन झा, याने कथितरित्या संसदेबाहेर होणाऱ्या निषेधाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. ललित झा वगळता बाकीच्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. ललित झा आणि महेश कुमावत नंतर स्वत: पोलिसांना शरण आले. इतर आरोपींची बरीच माहिती समोर आली आहे, पण महेश कुमावत कोण आहे, हे जाणून घेऊया.

कोण आहे महेश कुमावत?मीडिया रिपोर्टनुसार, 13 डिसेंबर रोजी महेश कुमावत दुसऱ्या गेटवर स्मोक कँडल घेऊन उभा राहणार होता, पण तो दिल्लीत येऊ शकला नाही. इतर आरोपींसोबत महेशदेखील या कटात महत्वाचा आरोपी आहे. शनिवारीच महेशला चौकशीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. ही योजना यशस्वी करण्यासाठी महेश गेल्या दोन वर्षांपासून आरोपींच्या संपर्कात होता. पुरावे नष्ट करुन त्याने आरोपींना मदतही केली. या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यासाठी महेशची चौकशी करण्याची गरज असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदCrime Newsगुन्हेगारीCentral Governmentकेंद्र सरकारPoliceपोलिसdelhiदिल्ली