शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

घुसखोरांना लोकसभेत एन्ट्री कशी मिळाली? संसदेचा पास देणाऱ्या भाजप खासदाराने सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 21:59 IST

भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासद्वारे आरोपी संसदेत घुसले होते.

Parliament Security Breach News: आज(दि.13) संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक घडली. एक महिला आणि तीन तरुण लोकसभेत घुसले आणि स्मोक कँडल फोडून गोंधळ घातला. दिल्ली पोलिसांनी त्या चौघांनाही अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजप खासदार प्रताप सिम्हा अडचणीत आले आहेत. त्यांनी दिलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीनेच आरोपी संसद भवनात शिरले होते.

आरोपी मनोरंजन गौडा, अमोल शिंदे, सागर शर्मा आणि शिवानी सिंह प्रताप सिम्हा यांच्या पासवर संसदेत दाखल झाले आणि व्हिजिटर गॅलरीत बसले. यामुळे विरोधक सिम्हा यांच्यावर टीका करत आहेत. या घटनेनंतर बुधवारी संध्याकाळी सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. 

संबंधित बातमी- 'संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, अमित शाह उत्तर द्या...', मल्लिकार्जुन खर्गेंनी सरकारला घेरले

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रताप सिम्हा आरोपीच्या वडिलांना ओळखतात. याच ओळखीमुळे आरोपी सिम्हा यांच्या संपर्कात होते. खासदार सिम्हा सांगतात की, आरोपींनी वारंवार संसद भवन संकुल पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ते त्यांच्या पीएच्या सतत संपर्कात होते. त्यांच्याकडे या प्रकरणाची अधिक माहिती नाही. 

संबंधित बातमी- 'माझ्या मुलाला फाशी द्या...' संसदेत स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया

कोण आहेत प्रताप सिम्हा? प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. सलग दोन वेळा ते या जागेवरून विजयी झाले आहेत. कर्नाटकातील भाजपच्या युवा मोर्चाचे ते माजी अध्यक्ष राहिले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी प्रताप सिम्हा पत्रकार होते. 1999 मध्ये प्रताप सिम्हा यांनी कन्नड वृत्तपत्र विजया कर्नाटकमधून प्रशिक्षणार्थी म्हणून पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी लेखन सुरू केले आहे.

संबंधित बातमी- संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video...

पीएम मोदींवर पुस्तक लिहिले प्रताप सिंह यांचा जन्म कर्नाटकातील हिल स्टेशनपैकी एक असलेल्या सकलेशपूर येथे झाला. 2008 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'नरेंद्र मोदी: यारू थुलियादा हदी' (नरेंद्र मोदी: द अनट्रोडन रोड) नावाचे पुस्तक लिहिले. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर त्यांनी पुन्हा म्हैसूरमधून 2019 ची निवडणूक लढवली आणि जिंकली.

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदारParliamentसंसदCrime Newsगुन्हेगारी