शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप, लोकसभेत खडाजंगी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 18:38 IST

Parliament Monsoon Session 2024: ज्याच्या जातीचा पत्ता नाही, तो जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहे, असं विधान अनुराग ठाकूर यांनी केलं. अनुराग ठाकूर यांनी हे विधान करताचा सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. त्याचवेळी राहुल गांधीही उठून उभे राहिले आणि अनुराग ठाकूर यांच्यावर प्रतिहल्ला केला

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षात असलेली इंडिया आघाडी यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. लोकसभेमध्ये आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. यादरम्यान, अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, माझा अपमान केला, मात्र मला यांच्याकडून माफीही नको आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.  

आज लोकसभेमध्ये अध्यक्षांच्या आसनावर तालिका सभापती जगदंबिका पाल हे बसलेले असताना ही घटना घडली. त्यावेळी LoP चा संपूर्ण अर्थ लीडर ऑफ अपोझिशन असा होते. लीडर ऑफ प्रोपेगेंडा होत नाही, हे राहुल गांधी यांना माहिती असलं पाहिजे, असं विधान अनुराग ठाकूर यांनी केलं होतं.  काँग्रेसने सत्तेवर असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलाय, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला. तसेच ज्याच्या जातीचा पत्ता नाही, तो जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहे, असं विधान अनुराग ठाकूर यांनी केलं. अनुराग ठाकूर यांनी हे विधान करताचा सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. त्याचवेळी राहुल गांधीही उठून उभे राहिले आणि अनुराग ठाकूर यांच्यावर प्रतिहल्ला केला. 

यावेळी महाभारताचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, अध्यक्ष महोदय, जो कुणी दलितांचे प्रश्न उपस्थित करतो त्याला शिव्या ऐकाव्या लागतात. मी या सर्व शिव्या आनंदाने ऐकून घेईन. महाभारताचा विषयच निघाला आहे तर सांगतो की, अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसला होता. आम्हाला जातीनिहाय जनगणन हवी आहे. तसेच आम्ही ती करून घेऊ, त्यासाठी मला कितीही शिव्याशाप ऐकावे लागले तरी चालतील. अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली आहे. मात्र मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही. 

राहुल गांधी यांच्या प्रतिहल्ल्यानंतर सभागृहात पुन्हा गोंधळ वाढला. त्यानंतर अध्यक्षांच्या आसनावर असलेल्या जगदंबिका पाल यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले. त्यावेळी अखिलेश यादव यांनी उभे राहत मोर्चा सांभाळला. तसेच राहुल गांधी यांना पाठिंबा देत केंद्र आणि सत्ताधारी भाजपावर टीका केली आणि सभागृहामध्ये कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर जगदंबिका पाल यांनी सभागृहात कुणीही कुणाची जात विचारणार नाही, अशी सूचना दिली.  

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा