Parliament Mansoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज(दि.28) ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान सरकारसह विरोधी पक्षातील खासदारही आपले मत मांडणार आहेत. काँग्रेसकडूनसंसदेत बोलणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली आहे, मात्र या यादीतून पक्षाचे दिग्गज नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांना वगळण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. या मागणीनुसार, आजपासून संसदेत या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेसकडून बोलणाऱ्या नेत्यांमध्ये शशी थरुर यांचे नाव समाविष्ट केले जाईल, अशी अटकळ होती, परंतु काँग्रेसने त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. याबाबत विचारले असता, थरुर यांनी 'मौन व्रत, मौन व्रत' असे म्हटले आणि हसत हसत सभागृहात निघून गेले.
काँग्रेसने सहा नावांची घोषणा केलीपहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीत गौरव गोगोई, प्रियंका गांधी वाड्रा, दीपेंद्र हुडा, प्रणिती एस शिंदे, सप्तगिरी उलाका, बिजेंद्र एस ओला यांचे नाव आहे. तर, सरकारच्या वतीने राजनाथ सिंह, बैजयंत पांडा, डॉ. एस जयशंकर, तेजस्वी सूर्या, संजय जैस्वाल, अनुराग ठाकूर आणि कमलजीत सेहरावत संसदेत बोलतील.
कोणत्या पक्षाकडून कोण बोलेल?
काँग्रेस
गौरव गोगोई
प्रियांका वड्रा
दीपेंद्र हुडा
प्रणिती शिंदे
सप्तगिरी उल्का
बिजेंद्र ओला
टीडीपी
लावू श्रीकृष्ण - टीडीपी
हरीश बालयोगी - टीडीपी
सपा
रमाशंकर राजभर - सपा
छोटे लाल - सपा
टीएमसी
कल्याण बॅनर्जी AITC
सायोनी घोष AITC
के फ्रान्सिस जॉर्ज के.सी
द्रमुक
ए राजा द्रमुक
के कनिमोळी द्रमुक
राष्ट्रवादीचे (एसपी)
अमर काळे NCP(SP)
सुप्रिया सुळे NCP (SP)