साईडप˜्या बनताहेत पार्किंग वारंवार कोंडी : कारवाईची मागणी

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:07+5:302015-08-18T21:37:07+5:30

मंचर : शहरातील साळी हॉस्पिटल ते शिवाजी चौक या रस्त्याचे काम झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्रास वाहने उभी केली जातात. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होते. श्री क्षेत्र भीमाशंकरला जाणार्‍या भाविकांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे.

Parking on the sidewalk often takes place: demand for action | साईडप˜्या बनताहेत पार्किंग वारंवार कोंडी : कारवाईची मागणी

साईडप˜्या बनताहेत पार्किंग वारंवार कोंडी : कारवाईची मागणी

चर : शहरातील साळी हॉस्पिटल ते शिवाजी चौक या रस्त्याचे काम झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्रास वाहने उभी केली जातात. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होते. श्री क्षेत्र भीमाशंकरला जाणार्‍या भाविकांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
मंचर शहरातून जुना पुणे-नाशिक महामार्ग गेला आहे. त्यासाठी साळी हॉस्पिटल ते शिवाजी चौैक या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढून साईडप˜्या भरण्यात आल्या. या भरलेल्या साईडप˜्या पार्किंग बनू लागल्या आहेत. वाहनचालक त्यांची वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी करुन निघून जातात. दुचाकी चालकसुद्धा त्यांची वाहने जागा मिळेल तेथे उभी करुन वाहतुकीला अडथळा आणतात. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरून वाहनांना जाताच येत नाही. दोन वाहने एकमेकांना पास होत नाही. एखादे अवजड वाहन आले की मग बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याने वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. मागील शनिवारी, रविवारी व सोमवारी या तीन दिवशी श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने वाहनातून गेले. त्या वेळी सर्वांत जास्त वाहतूक कोंडी झाली.
दूरवरून आलेल्या प्रवाशांचे त्यामुळे खूप हाल झाले. घोडेगाव रस्त्यावरसुद्धा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतानाच काहींनी त्यांची दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहतूककोंडीत भर पडली. पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने यापुढे रस्त्यावर वाहने उभी राहू देऊ नयेत, अशी मागणी प्रवाशांनी व नागरिकांनी केली आहे.
फाटो ओळ : मंचर शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात असल्याने वारंवार वाहतूककोंडी होते.

Web Title: Parking on the sidewalk often takes place: demand for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.