संसद परिसरातच 'परिणीती'चा प्रश्न; स्मीतहास्य करत खासदार राघव यांचे मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:06 IST2023-03-24T13:14:49+5:302023-03-24T14:06:26+5:30

बॉलिवूड स्टार्सच्या अफेअरच्या चर्चा फार काळ लपत नाहीत. आता, अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अफेअरच्या (Parineeti Chopra ) चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.

Parineeti's issue in Parliament premises; AAP MP Ravagh chaddhas's funny reply with a smile | संसद परिसरातच 'परिणीती'चा प्रश्न; स्मीतहास्य करत खासदार राघव यांचे मजेशीर उत्तर

संसद परिसरातच 'परिणीती'चा प्रश्न; स्मीतहास्य करत खासदार राघव यांचे मजेशीर उत्तर

नवी दिल्ली - सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनासाठी सर्वच पक्षांचे खासदार राजधानी दिल्लीत आहेत. त्यामुळे, सभागृहाबाहेर पत्रकारांच्या प्रश्नांवर ते उत्तर देताना दिसून येतात. यावेळी, देशातील राजकीय परिस्थिती आणि देशातील विविध प्रश्नांवर खासदारआपली भूमिका मांडतात. मात्र, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना पत्रकाराने एक खासगी प्रश्न विचारला, पण या प्रश्नावर उत्तर न देता केवळ धन्यवाद म्हणून खासदार राघव यांनी पळ काढल्याचे दिसून आले. संसद आवारातच पत्रकाराने यंग खासदार महोदयांना गाठून परिणीती चोप्राबद्दल विचारलं होतं. 

बॉलिवूड स्टार्सच्या अफेअरच्या चर्चा फार काळ लपत नाहीत. आता, अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अफेअरच्या (Parineeti Chopra ) चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासमवेत परिणीतीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यावरुन, दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आहेत आणि पंजाबचे राज्यसभा खासदार आहेत. गुरुवारी मुंबईत परिणीती राघव यांच्यासोबत दिसली. एका रेस्टॉरंटबाहेर दोघांनाही स्पॉट केलं गेलं. मस्ती मूडमधील त्यांचे रेस्टॉरंटबाहेरचे फोटो व्हायरल होताच, परिणीती व राघव यांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्यात. 

अद्याप परिणीती व राघव यावर काहीही बोलले नाहीत. त्यामुळे तूर्तास सगळ्या चर्चा आहेत. मात्र, संसंद परिसरात आज एका पत्रकाराने खासदार राघव यांना गाठून याबाबत विचारलं. त्यावेळी, तुम्ही मला राजकीय प्रश्न विचारा, ओन्ली राजनिती, नो परिणीती असे म्हणत राघव यांनी उत्तर देणे टाळले. तसेच, स्मीतहास्य करत धन्यवाद.. धन्यवाद... म्हणत ते आपल्या कारमधून निघून गेले. 

दरम्यान, यावर्षाच्या जानेवारी महिन्यात परिणीती चोप्रा आणि  राघव चड्ढा यांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' या सन्मानाने एकत्रितपणे सन्मानित करण्यात आलं होतं. भारतात पहिल्यांदाच एखाद्याला हा सन्मान मिळाला  होता. 

Web Title: Parineeti's issue in Parliament premises; AAP MP Ravagh chaddhas's funny reply with a smile