शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

आवडीच्या क्षेत्रात मुलांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्या, मोदींचं पालकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 13:33 IST

मुलांना आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालकांना केलं आहे.

नवी दिल्लीः मुलं मोठी झाली आहेत, याचा स्वीकार करा, मुलं दोन-तीन वर्षांची असताना त्यांना मदत करण्याची जी भावना होती, ती कायम ठेवा, मुलांना आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालकांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर 'परीक्षा पे चर्चा 2020 (Pariksha Pe Charcha 2020 LIVE)' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.जेवढं जास्त तुम्ही आपल्या पाल्याला प्रेरणा द्याल, तेवढाच त्याचा चांगला परिमाण येईल. जेवढा दबाव टाकाल, तेवढ्याच समस्या त्याच्यासाठी निर्माण होतील. आता आई-वडील आणि शिक्षकांनी काय निवडायचं आहे ते ठरवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलांनाही काही सूचना केल्या आहेत. तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास करता. त्यावेळी तुमचं डोकं तंदुरुस्त असतं. पण प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य असते.त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला सोयीस्कर असेल तेव्हा अभ्यास करा. दिवसभरातील कामं आणि थकव्यामुळे डोकं काहीसं गुंतलेलं असतं. दिवसभरातील घटनांनी डोक्यात बऱ्याचदा काहूर माजलेलं असतं. त्यामुळे डोकं शांत असल्यावर अभ्यास करा, असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे.कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीनं मुलांवर दबाव टाकता कामा नये. मुलाची क्षमता ओळखूनच आई-वडील आणि शिक्षकांनी त्यांच्याकडून अपेक्षा केल्या पाहिजेत. 2022मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होतील, त्यावेळी माझे भारतीय Make In India वस्तूच खरेदी करतील. त्यामुळे देशाचं भलं होणार असून, अर्थव्यवस्थेलाही एक वेगळीच ताकद मिळणार आहे. अधिकार आणि कर्तव्याची सांगड घालता न आल्यास गडबड होते. जेव्हा आपण अध्यापक म्हणून कर्तव्य बजावता तेव्हा विद्यार्थ्यांच्या अधिकारांचं संरक्षण होतं.अरुणाचल प्रदेश असा देश आहे जिथे आजही जय हिंद बोललं जातं. असा हिंदुस्थान फार कमी जागी असतो. आपल्या सगळ्यांनीच ईशान्य भारतात नक्कीच जायला हवं. आताची पिढी ही गुगलवरून ट्रेन वेळेत आहे की नाही ही माहिती मिळवते. नव्या पिढीला तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे हे समजलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी