आवडीच्या क्षेत्रात मुलांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्या, मोदींचं पालकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 01:32 PM2020-01-20T13:32:55+5:302020-01-20T13:33:13+5:30

मुलांना आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालकांना केलं आहे.

pariksha pe charcha 2020 pm narendra modi talks with students | आवडीच्या क्षेत्रात मुलांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्या, मोदींचं पालकांना आवाहन

आवडीच्या क्षेत्रात मुलांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्या, मोदींचं पालकांना आवाहन

Next

नवी दिल्लीः मुलं मोठी झाली आहेत, याचा स्वीकार करा, मुलं दोन-तीन वर्षांची असताना त्यांना मदत करण्याची जी भावना होती, ती कायम ठेवा, मुलांना आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालकांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर 'परीक्षा पे चर्चा 2020 (Pariksha Pe Charcha 2020 LIVE)' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

जेवढं जास्त तुम्ही आपल्या पाल्याला प्रेरणा द्याल, तेवढाच त्याचा चांगला परिमाण येईल. जेवढा दबाव टाकाल, तेवढ्याच समस्या त्याच्यासाठी निर्माण होतील. आता आई-वडील आणि शिक्षकांनी काय निवडायचं आहे ते ठरवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलांनाही काही सूचना केल्या आहेत. तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास करता. त्यावेळी तुमचं डोकं तंदुरुस्त असतं. पण प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य असते.


त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला सोयीस्कर असेल तेव्हा अभ्यास करा. दिवसभरातील कामं आणि थकव्यामुळे डोकं काहीसं गुंतलेलं असतं. दिवसभरातील घटनांनी डोक्यात बऱ्याचदा काहूर माजलेलं असतं. त्यामुळे डोकं शांत असल्यावर अभ्यास करा, असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीनं मुलांवर दबाव टाकता कामा नये. मुलाची क्षमता ओळखूनच आई-वडील आणि शिक्षकांनी त्यांच्याकडून अपेक्षा केल्या पाहिजेत. 2022मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होतील, त्यावेळी माझे भारतीय Make In India वस्तूच खरेदी करतील. त्यामुळे देशाचं भलं होणार असून, अर्थव्यवस्थेलाही एक वेगळीच ताकद मिळणार आहे. अधिकार आणि कर्तव्याची सांगड घालता न आल्यास गडबड होते. जेव्हा आपण अध्यापक म्हणून कर्तव्य बजावता तेव्हा विद्यार्थ्यांच्या अधिकारांचं संरक्षण होतं.
अरुणाचल प्रदेश असा देश आहे जिथे आजही जय हिंद बोललं जातं. असा हिंदुस्थान फार कमी जागी असतो. आपल्या सगळ्यांनीच ईशान्य भारतात नक्कीच जायला हवं. आताची पिढी ही गुगलवरून ट्रेन वेळेत आहे की नाही ही माहिती मिळवते. नव्या पिढीला तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे हे समजलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

 

Web Title: pariksha pe charcha 2020 pm narendra modi talks with students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.