मुलीच्या प्रियकराचा खून करून पित्याचे आत्मसमर्पण

By Admin | Updated: August 8, 2014 16:31 IST2014-08-08T16:31:33+5:302014-08-08T16:31:33+5:30

११ वर्षाच्या मुलीच्या प्रियकराची निर्घृण हत्या करून तिच्या वडिलांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केले आहे.

Parent Surrender by killing a girl's beloved boy | मुलीच्या प्रियकराचा खून करून पित्याचे आत्मसमर्पण

मुलीच्या प्रियकराचा खून करून पित्याचे आत्मसमर्पण

ऑनलाइन टीम
बेंगळूरू, दि. ८ - ११ वर्षाच्या मुलीच्या प्रियकराची निर्घृण हत्या करून तिच्या वडिलांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केले आहे. रियाझ खान (वय ४०) यांनी त्यांच्या मुलीच्या नाद सोडावा असे तिचा प्रियकर सादीक पाशा (वय १८) यास बजावले होते. परंतू त्याने न ऐकल्याने मला हे पाऊल उचलावे लागले, अशी कबुली खान यांनी के. आर. पुरम पोलिस स्थानकात दिली आहे.
खान यांची मुलगी ३० जून रोजी ईद नंतर घरी आली नव्हती. त्यानंतर तिच्या वडिलांनी १ ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिच्या वडिलांना सादीकचा संशय आला व त्यांनी सादीकचा खून करण्याच्या उद्देशाने बन्नारघट्टा रोड येथे जाऊन सादीकला ठार मारल्याचे उपायुक्त कुमार यांनी सांगितले आहे.
खान याने सादीकची गळा चिरून हत्या केली व त्याचे शव एका गोणीत भरून मोटरसायकलवर लादून घटनास्थळापासून २० किलोमिटर दूर असलेल्या के. आर. पुरम पोलिसस्थानकात नेले. तसेच आपण सादीकचा खून केल्याची कबुली दिली. खान याची मुलगी पाशाच्या घरी होती, त्यानंतर तिला वडिलांच्या नातेवाईकांच्या घरी पाठवण्यात आले. खूनाच्या वेळी ती कुठे होती, या बद्दल तसेच या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Web Title: Parent Surrender by killing a girl's beloved boy