शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

परमबीरसिंह चंडीगडमध्ये ‘प्रकटले’; वृत्तवाहिनीला दिली माहिती, चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 6:36 AM

शरण येणार का, असाही प्रश्न केला असता याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर सिंह बुधवारी सायंकाळी टेलिग्राम सोशल मीडिया ॲपवर आले. मात्र, काही वेळाने त्यांनी पुन्हा अकाउंट डिलिट केले.

चंदीगड/मुंबई : खंडणी प्रकरणांत गुन्हा नोंदविण्यात आलेले व गेल्या मे महिन्यापासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचा ठावठिकाणा अखेरीस लागला. आपण चंडीगडमध्ये असल्याचे त्यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीकडे स्पष्ट केले. परमबीर यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथे सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्याविरोधात मुंबईत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे परमबीर यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण देशातच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास दोन दिवसांत चौकशीला हजर राहू, असे परमबीर यांनी कोर्टात वकिलामार्फत स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने परमबीर यांना अटकेपासून संरक्षण दिले. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख अनिल देशमुख यांच्यावर परमबीरसिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ते मे महिन्यात रजेवर गेले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा नव्हता. त्यांच्याविरोधात अनेकदा समन्स बजावल्यानंतर मुंबईतील कोर्टाने गेल्या आठवड्यात त्यांना फरारी घोषित केले. त्यामुळे परमबीर यांना सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी लागली. 

टेलिग्रामवर सक्रिय झाले पण...शरण येणार का, असाही प्रश्न केला असता याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर सिंह बुधवारी सायंकाळी टेलिग्राम सोशल मीडिया ॲपवर आले. मात्र, काही वेळाने त्यांनी पुन्हा अकाउंट डिलिट केले.  

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगchandigarh-pcचंडीगढ़Mumbaiमुंबई