Video: पॅराग्लायडिंग करताना भीषण अपघात; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 04:59 PM2018-11-28T16:59:24+5:302018-11-28T17:01:15+5:30

पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू; पर्यटक गंभीर जखमी

paragliding pilot died in west bengal kalimpongs air glider aircraft | Video: पॅराग्लायडिंग करताना भीषण अपघात; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Video: पॅराग्लायडिंग करताना भीषण अपघात; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Next

कोलकाता: पश्चिम बंगालच्या कालिम्पोंग पॅराग्लायडिंग करताना भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नेपाळच्या एका पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाला आहे. ग्लायडर विमानात बिघाड झाल्यानं ही दुर्घटना घडली. ग्लायडर विमान आणि पॅराग्लायडर्सला जोडणारा दोर तुटल्यानं पॅराग्लायडिंग करणारे दोनजण खाली कोसळले. यात पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाला, तर पॅराग्लायडिंगचा आनंद घेत असलेला पर्यटक गंभीर जखमी झाला.

रविवारी पश्चिम बंगालच्या कालिम्पोंगमध्ये पॅराग्लायडिंग करताना अपघात झाला. ग्लायडर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं तार तुटली आणि पॅराग्लायडिंग करणारे दोनजण थेट खाली कोसळले. यामध्ये पॅराग्लायडिंग पायलट आणि पर्यटकाचा समावेश आहे. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी पॅराग्लायडिंग पायलट पुरुषोत्तम यांना मृत घोषित केलं. पुरुषोत्तम हे मूळचे नेपाळचे आहेत. 



पुरुषोत्तम यांच्यासोबत एक पर्यटकदेखील होता. त्याचं नाव गौरव चौधरी असल्याची माहिती मिळाली आहे. गौरव या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलीस या दुर्घटनेचा तपास करत आहेत. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दुर्घटनेवेळी गौरव आणि पुरुषोत्तम काही हजार फूट उंचीवर होते. तार तुटताच पायलटनं गौरव यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. 

Web Title: paragliding pilot died in west bengal kalimpongs air glider aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.