प. बंगालमध्ये ५० बळी
By Admin | Updated: August 2, 2015 22:46 IST2015-08-02T22:46:52+5:302015-08-02T22:46:52+5:30
पश्चिम बंगालमधील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर बनली. या पुराने आतापर्यंत ५० जणांचा बळी घेतला आहे आणि बेघर झालेल्या २.१४ लाख लोकांना १२

प. बंगालमध्ये ५० बळी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर बनली. या पुराने आतापर्यंत ५० जणांचा बळी घेतला आहे आणि बेघर झालेल्या २.१४ लाख लोकांना १२ जिल्ह्णांत स्थापन करण्यात आलेल्या १५३७ मदत शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान राज्यात पुढच्या २४ तासांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. रविवारी पाऊस आणि पुराशी संबंधित अपघातांमध्ये नऊजण मृत्युमुखी पडले. राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्णांमध्ये १५३७ मदत शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. या पुराचा ३७ लाख लोकांना फटका बसल्याचे वृत्त आहे.
राज्यात ३८०४६ घरे कोसळली आणि जवळपास ४७२६४५ हेक्टरवरील उभी पिके नष्ट झाली आहेत. पुराचा सर्वाधिक तडाखा दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, नादिया आणि मुशिरदाबाद या जिल्ह्णांना बसलेला आहे.
गुजरात, राजस्थानात लष्कराची मदत
गुजरात आणि राजस्थानमध्येही पुराने कहर केला असून तेथे पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्कराचे जवान बचाव कार्याला लागले आहेत. लष्कराने आतापर्यंत १००० वर लोकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविल्याचे वृत्त आहे.