शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:56 IST

Cough Syrup Death: मुलगी लवकर बरी होईल. पण त्या सिरपने तिचा जीव घेतला. योजिता तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज देत होती.

Cough Syrup Death: दोन वर्षांच्या योजिता ठाकरेला हलका ताप आला होता. तिचे वडील सुशांत तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी इतर औषधांसह एक सिरप लिहून दिले. सर्वांना वाटलं की, मुलगी लवकर बरी होईल. पण त्या सिरपने तिचा जीव घेतला. योजिता तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज देत होती. १६ वेळा तिचं डायलिसिस केल्यानंतरही तिला वाचवता आलं नाही.

८ सप्टेंबर रोजी छिंदवाडा येथील एका खासगी शाळेत शिकवणारा सुशांत ठाकरे त्याची मुलगी योजिताला घेऊन डॉक्टरकडे पोहोचला. ज्यांच्याकडे नेहमी उपचार घेत असे, ते डॉक्टर त्या दिवशी क्लिनिकमध्ये नव्हते. सुशांतने जवळच्या डॉक्टर प्रवीण सोनीशी संपर्क साधला. डॉ. सोनी यांनी काही औषधं लिहून दिली आणि ती चार वेळा देण्याचा सल्ला दिला, "काहीही अडचण नाही, ती उद्यापर्यंत बरी होईल" असं सांगितलं. सुशांतने त्याच्या मुलीला त्यांच्यासमोर पहिला डोस दिला. दुसरा रात्री तीन वाजता, तिसरा पहाटे आणि चौथा दुपारी. पण त्या दिवसानंतर जे घडले त्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं.

भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य

दुसऱ्या दिवशी सकाळी ताप कमी झाला, पण योजिताची प्रकृती आणखी बिघडली. तिला उलट्या झाल्या. सुशांत पुन्हा डॉ. प्रवीण सोनी यांच्याकडे गेला. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर सांगितलं, "किडनीला इन्फेक्शन झालं आहे. तिला ताबडतोब नागपूरला घेऊन जा. छिंदवाड्यात ती बरी होऊ शकत नाही. सुशांतने मुलीला नागपूरला नेलं.

"लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो

नागपूरला पोहोचल्यावर, डॉक्टरांनी सांगितलेल्या रुग्णालयात डायलिसिसची सुविधा नव्हती. योजिताला त्याच रात्री नेल्सन रुग्णालयात नेण्यास भाग पाडण्यात आलं. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला. २२ दिवसांचे सतत उपचार, १६ डायलिसिस, व्हेंटिलेटर आणि असंख्य इंजेक्शन्स. प्रत्येक डायलिसिसमुळे सुशांतच्या आशा मावळत होत्या. "पप्पा, चला घरी जाऊया..." असं त्याची लेक त्याला सारखं म्हणायची.

"कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "

नेल्सन हॉस्पिटलचं बिल १२ लाख रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. सुशांत एक साधा शिक्षक आहे, त्याचा महिन्याचा पगार त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी जेमतेम होता. तरीही, त्याने हार मानली नाही. त्याच्या भावाने एफडी मोडली, मित्रांनी मदत केली आणि त्याच्या सासरच्यांनी त्यांच्याकडे जे काही होते ते दिलं. मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने एक लाख पाठवले. शाळेतील सहकारी शिक्षक आणि शेजाऱ्यांनीही मदतीचा हात पुढे केला. पण मुलीचा जीव वाचला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Cough syrup claims girl's life after 22-day battle.

Web Summary : Two-year-old Yogita died after a cough syrup, prescribed for a fever, caused kidney failure. Despite 16 dialysis sessions and 22 days of intensive care, she succumbed. Her father, a teacher, struggled to pay the ₹12 lakh hospital bill.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू