वृद्ध दांपत्याच्या घरातून २ किलो सोने चोरले घाटकोपरमधील घटना : पंतनगर पोलिसांकडून तपास सुरू
By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:15+5:302015-07-29T00:42:15+5:30
वृद्ध दांपत्याच्या घरातून २ किलो सोने चोरले

वृद्ध दांपत्याच्या घरातून २ किलो सोने चोरले घाटकोपरमधील घटना : पंतनगर पोलिसांकडून तपास सुरू
व द्ध दांपत्याच्या घरातून २ किलो सोने चोरलेघाटकोपरमधील घटना : पंतनगर पोलिसांकडून तपास सुरूमुंबई: घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध दांपत्याच्या घरात घुसून तब्बल दोन किलो सोने लंपास केले. याबाबत पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला आहे. घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील पल्लवी सोसायटीमध्ये अंटोनी आणि कॉन्सेप्टा फेरो हे वृद्ध दाम्पत्य राहाते. दोघेही सेवानिवृत्त असून त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा कल्याणला राहातो. त्याच्याकडे हे दाम्पत्य २० जुलैपासून गेले होते. आठवडयाभराने दाम्पत्य घरी परतले तेव्हा त्यांना दरवाजा उघडाच आढळला. तसेच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी बेडरुममध्ये प्रवेश केला असता चोरट्यांनी बेडरुमधील कपाट तोडून कपाटामधील २ किलो वजनाचे दागिने अणि ४० हजार रुपये लंपास केल्याचे त्यांना समजले. त्यानुसार त्यांनी तत्काळ पंतनगर पोलीस ठाण्यात ही महिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. दरम्यान चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करुन ही घरफोडी केल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. (प्रतिनिधी)