पानसरे हल्ला प्रकरण
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:53+5:302015-02-18T23:53:53+5:30
पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या

पानसरे हल्ला प्रकरण
प नसरे यांच्यावरील हल्ल्याच्यानिषेधार्थ वकिलांची निदर्शनेनागपूर : कोल्हापूर येथे प्रख्यात विचारवंत, लेखक ॲड. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी वकिलांनी संविधान चौकात तीव्र निदशर्ने केली. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वकील मंडळी जिल्हा न्यायालयाच्या कंपाऊंड गेट समोर एकत्र आली. नारे निदर्शने सुरू करताच न्यायालय सुरक्षा चौकीतील अधिकाऱ्याने त्वरित ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे पोलिसांचा ताफा त्वरित गेटजवळ धडकला. निदर्शने करणाऱ्यांकडे परवानगी नसल्याने ही सर्व वकील मंडळी आकाशवाणी चौकमार्गे संविधान चौकात दाखल झाली. या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पानसरे यांच्यावरील हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारे कृत्य होय, अशा शब्दात वकिलांनी आपला निषेध व्यक्त केला. निदर्शने करणाऱ्यांमध्ये ॲड. सुदेश नितनवरे, ॲड. सुरेश घाटे, ॲड. सुनील धनविजय, ॲड. आनंद गजभिये, ॲड. सुरेश मेश्राम आदींचा समावेश होता.