बीडच्या राजकारणात पंकजा मुंडेंना धक्का! धनजंय मुंडेंनी जिंकली पांगरी ग्रामपंचायत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 01:10 PM2017-10-09T13:10:22+5:302017-10-09T13:18:48+5:30

आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे.

Pankaja Mundena pushing Beed's politics! Dhananjay Munde won | बीडच्या राजकारणात पंकजा मुंडेंना धक्का! धनजंय मुंडेंनी जिंकली पांगरी ग्रामपंचायत

बीडच्या राजकारणात पंकजा मुंडेंना धक्का! धनजंय मुंडेंनी जिंकली पांगरी ग्रामपंचायत

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडेंचा असा सामना रंगला आहे.सध्या बीडमध्ये होणा-या प्रत्येक निवडणुकीकडे पंकजा विरुद्ध धनंजय म्हणून पाहिले जाते.

बीड - आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांच वर्चस्व असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या पॅनलने जिंकली आहे. 

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडेंचा असा सामना रंगला आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीत धनजंय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का दिला होता. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये बहिण-भावाचे नाते आहे. धनजंय भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. धनजंय मुंडे आधी भाजपामध्ये होते. पण पुढे गोपीनाथ मुंडेंबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

सध्या बीडमध्ये होणा-या प्रत्येक निवडणुकीकडे पंकजा विरुद्ध धनंजय म्हणून पाहिले जाते. आज राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरु आहे. यावेळी प्रथमच लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे. 

मागच्या आठवडयात दस-याच्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार मानणार नाही असे म्हटले होते.  दस-याच्या निमित्ताने माझ्या गरीब समाजबांधवांशी संवाद साधण्याची संधी नाकारली गेली. कर्मभूमीने जरी नाकारले असले तरी भगवानबाबांच्या पवित्र जन्मभूमीने बोलाविल्यामुळे मी समाजासाठी येथे आले आहे असे सांगत आयुष्यात कितीही संकटे आली तरी ‘हार नही मानूंगी...अशा शब्दात महिला विकास व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. 

बीड जिल्ह्यातील संत भगवानबाबांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र सावरगावघाट (ता. पोटोदा)येथे शनिवारी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जमलेल्या समाजबांधवांसमोर नतमस्तक होत पंकजा यांनी मला राज्यात कुठेच भाषण बंदी नाही आणि गडावरच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. भगवानबाबांचे भक्त या नात्याने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर समाजातील गोरगरीबांची सेवा केली. जमेल तशी काळजी घेतली. मीदेखील हाच वारसा पुढे चालवित असून त्यासाठीच आज तुमच्यापुढे उभी आहे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Pankaja Mundena pushing Beed's politics! Dhananjay Munde won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.