पंकजा मुंडेंना लोकसभेवर पाठविण्याचे संकेत

By Admin | Updated: June 9, 2014 03:31 IST2014-06-09T03:31:35+5:302014-06-09T03:31:35+5:30

भाजपामध्ये मुंडे यांची जागा कोण घेणार, अशी राजकीय चर्चा सुरू झालेली असताना आता प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे-पालवे याच मुंडे यांच्या वारसदार असल्याचे स्पष्ट केले

Pankaja Mundane signs to send to the Lok Sabha | पंकजा मुंडेंना लोकसभेवर पाठविण्याचे संकेत

पंकजा मुंडेंना लोकसभेवर पाठविण्याचे संकेत

परळी (जि.बीड) : भाजपामध्ये मुंडे यांची जागा कोण घेणार, अशी राजकीय चर्चा सुरू झालेली असताना आता प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे-पालवे याच मुंडे यांच्या वारसदार असल्याचे स्पष्ट करीत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपली चर्चा झाल्याचा हवालाही फडणवीस यांनी दिला आहे. परिणामी, पंकजा या लोकसभेवर जातील, असे संकेत मिळत आहेत.
केंद्रीय मंत्री रावसाबेह दानवे, फडणवीस यांनी आज, रविवारी पंकजा मुंडे-पालवे, प्रज्ञाताई मुंडे, प्रीतम, यशश्री यांची परळीत येऊन भेट घेत सांत्वन केले़ या वेळी त्यांनी पंकजा व प्रज्ञाताई यांच्याशी चर्चा केली़ काळजी करू नका, मुंडे यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी भाजपा सर्व शक्तिनिशी कुटुंबाच्या पाठीशी आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Pankaja Mundane signs to send to the Lok Sabha