पणजीत सेक्स रँकेट उघडकीस, 5 जणांना अटक

By Admin | Updated: June 10, 2016 18:37 IST2016-06-10T18:15:00+5:302016-06-10T18:37:05+5:30

गुन्हा अन्वेषण विभागाने पणजी शहरात छापा टाकून मोठे सेक्स रेकेट उघडकीस आणले. यात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर सुटका करण्यात आलेली युवती फिल्मी दुनियेत वावरणारी आहे.

Panjit opens a sex racket, 5 people arrested | पणजीत सेक्स रँकेट उघडकीस, 5 जणांना अटक

पणजीत सेक्स रँकेट उघडकीस, 5 जणांना अटक

>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १० -  गुन्हा अन्वेषण विभागाने पणजी शहरात छापा टाकून मोठे सेक्स रेकेट उघडकीस आणले. यात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर सुटका करण्यात आलेली युवती फिल्मी दुनियेत वावरणारी आहे. 
मुंबईतून मुलींना गोव्यात आणून वेश्याव्यवसायास लावण्याचे प्रकार या छाप्यातून ऊघडकीस आणले आहेत. एका युवतीची सुटका करण्यात आली आहे. या युवतीने काही चित्रपटातही कामे केली आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.  या छाप्यात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पणजीतील एका फ्लँटमध्ये संशयितांना अटक करण्यात आली. सुटका करण्यात आलेली युवतीही त्याच हॉटेलमध्ये सापडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पणजी,  बांबोळी, दोनापावला आणि रायबंदर येथे हे छापे टाकले.
 
50 हजारांचा सौदा...
सुटका करण्यात आलेल्या मुलीचा 50 हजार रुपयांना सौदा करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Panjit opens a sex racket, 5 people arrested