पेंग यांनी विद्याथ्र्यासमोर गायले गाणे
By Admin | Updated: September 19, 2014 02:03 IST2014-09-19T02:03:13+5:302014-09-19T02:03:13+5:30
चीनच्या प्रथम महिला नागरिक पेंग लियुआन यांनी दक्षिण दिल्लीतील टागोर इंटरनॅशनल स्कूलला भेट देत गाणो गात आपली छाप सोडली.

पेंग यांनी विद्याथ्र्यासमोर गायले गाणे
नवी दिल्ली : चीनच्या प्रथम महिला नागरिक पेंग लियुआन यांनी दक्षिण दिल्लीतील टागोर इंटरनॅशनल स्कूलला भेट देत गाणो गात आपली छाप सोडली. कठोर मेहनत घेतल्यास तुम्ही देशाला योगदान देऊ शकता, असा संदेशही त्यांनी दिला.
प्रसिद्ध गायिका असलेल्या 51 वर्षीय पेंग यांनी या शाळेत पाऊण तास घालविला. विद्यार्थी चिनी लोकगीत गात असताना पेंग यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळत टाळ्या मिळविल्या. त्यांनी आपल्या आयुष्यातील काही वैयक्तिक बाबी मुलांना सांगत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. पाच वर्षाची असताना मी कॅलिग्राफी (सुलेखन) सुरू केली. माङो वडील मला शिकवत होते, असे त्या म्हणाल्या. सदर शाळेकडून चालविला जात असलेला योग अभ्यास स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय महिला सुंदर आणि मेहनती..
भारतीय महिला सुंदर आणि मेहनती आहेत, या शब्दात पेंग यांनी प्रशंसा केली. मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्या कुटुंबाला बांधून ठेवतात, असे त्यांनी म्हटल्याचा उल्लेख या शाळेच्या प्राचार्य मधुलिका सेन यांनी टि¦टरवर केला.