शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मोठा 'आधार'! पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यास मुदतवाढ; लाखो नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 20:56 IST

पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ; अनेकांचा जीव भांड्यात पडला

नवी दिल्ली: आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. तशी घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आज आधार कार्ड आणि पॅन कार्ड करण्यासाठी अनेकांनी संकेतस्थळाला भेट दिली. संकेतस्थळावर मोठा भार आल्यानं ते बंद पडलं. त्यामुळे आता आधार आणि पॅन कार्ड करण्यास मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत आधार आणि पॅन लिंक न केलेल्यांना ३० जूनपर्यंत हे काम करता येईल. त्यामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Last date to link Aadhaar with PAN extended from March 31 to June 30)आज करू, उद्या करू...! लेट लतीफांच्या आधार-पॅन लिकिंगसाठी उड्या पडल्या; आयकरची वेबसाईटच क्रॅश झालीआधीच्या डेडलाईननुसार आधार-पॅनकार्ड लिंक (Aadhaar-PAN Linking) करण्याचा आज अखेरचा दिवस होता. यानंतर आधार-पॅन करायचं झाल्यास १००० रुपये भरावे लागणार होते. तसंच पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता होती. यामुळे आयकर विभागाच्या वेबसाईटवर (Income Tax Department) लेटलतीफांची मोठी गर्दी उसळली आहे. एकाचवेळी लाखोंच्या संख्येनं ट्रॅफिक आल्यानं आयकर विभागाची पॅन-आधार लिंक करण्याची लिंक क्रॅश झाली. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला.तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक झाले का? असे करा काही मिनिटांत चेक...

आयकर भरण्याच्या शेवटच्या दिवशी जशी आज करू, उद्या करू म्हणत शेवटच्या दिवशी काम करणाऱ्यांची तारांबळ उडते तशी तारांबळ आज उडालेली दिसत होती. यामुळे अनेकांना सर्व्हर हँग झाल्याने अडचणींचा सामना करावा लागला. अनेकजण सारखे सारखे प्रयत्न करत होते. मात्र, तरीदेखील दोन्ही कार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण झाली नाही.

आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून तशा बातम्याही सारख्या दिल्या जात होत्या. मात्र, तरीदेखील अनेकांनी लिंक केलं नसल्यानं त्यांच्या आजच्या एकाच दिवशी आयकर विभागाच्या वेबसाईटवर उड्या पडल्या. एकीकडे साईट क्रॅश झालेली असताना दुसरीकडे बँकांचे मेसेज ग्राहकांना टेन्शन देत होते. सोशल मीडियावर आयकरची लिंक बंद पडल्याच्या तक्रारी दिसत होत्या.   

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPan Cardपॅन कार्ड