Aadhaar-PAN Link: आज करू, उद्या करू...! लेट लतीफांच्या आधार-पॅन लिकिंगसाठी उड्या पडल्या; आयकरची वेबसाईटच क्रॅश झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:00 PM2021-03-31T14:00:18+5:302021-03-31T14:00:42+5:30

Aadhaar-PAN Link Process stopped, IT website hang: आयकर भरण्याच्या शेवटच्या दिवशी जशी आज करू, उद्या करू म्हणत शेवटच्या दिवशी काम करणाऱ्यांची तारांबळ उडते तशी तारांबळ आज उडालेली दिसत आहे. यामुळे अनेकांना सर्व्हर हँग झाल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Aadhaar-PAN Linking: income tax website crashed on last day; Link Aadhaar link not working | Aadhaar-PAN Link: आज करू, उद्या करू...! लेट लतीफांच्या आधार-पॅन लिकिंगसाठी उड्या पडल्या; आयकरची वेबसाईटच क्रॅश झाली

Aadhaar-PAN Link: आज करू, उद्या करू...! लेट लतीफांच्या आधार-पॅन लिकिंगसाठी उड्या पडल्या; आयकरची वेबसाईटच क्रॅश झाली

googlenewsNext

आधार-पॅनकार्ड लिंक (Aadhaar-PAN Linking) करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. यानंतर करायचे झाल्यास 1000 रुपये भरावे लागणार आहेत. तसेच पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे आयकर विभागाच्या वेबसाईटवर (Income Tax Department ) मोठी लेटलतीफांची मोठी गर्दी उसळली आहे. एकाचवेळी लाखोंच्या संख्येने ट्रॅफिक आल्याने आयकर विभागाची पॅन-आधार लिंक करण्याची लिंक क्रॅश झाली आहे. गेल्या तास-दोन तासापासून ही समस्या येऊ लागल्याने अनेकांना जीव टांगणीला लागला आहे. (Income Tax Department website crashed briefly as people rushed to link their PAN cards with Aadhaar on the last day.)


आयकर भरण्याच्या शेवटच्या दिवशी जशी आज करू, उद्या करू म्हणत शेवटच्या दिवशी काम करणाऱ्यांची तारांबळ उडते तशी तारांबळ आज उडालेली दिसत आहे. यामुळे अनेकांना सर्व्हर हँग झाल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण सारखे सारखे प्रयत्न करत आहेत, मात्र, तरीदेखील दोन्ही कार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होत नाहीय. 

Aadhaar-PAN Linking Status: तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक झाले का? असे करा काही मिनिटांत चेक...


आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून तशा बातम्याही सारख्या दिल्या जात होत्या. मात्र, तरीदेखील अनेकांनी लिंक केले नसल्याने त्यांच्या आजच्या एकाच दिवशी आयकर विभागाच्या वेबसाईटवर उड्या पडल्या आहेत. एकीकडे साईट क्रॅश झालेली असताना दुसरीकडे बँकांचे मेसेज ग्राहकांना टेन्शन देत आहेत. सोशल मीडियावर आयकरची लिंक बंद पडल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. 



आधार पॅन लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका खातेधारकाने आयकर विभागाच्या बंद पडलेल्या वेबसाईटचा स्क्रीन शॉट शेअर करत जर साईटची ही हालत आहे तर मी पॅन आधार लिंक कसे करणार असा सवाल केला आहे. 


दुसऱ्याने तुमची वेबसाईट कायमच बंद पडलेली असते, असा सवाल केला आहे. 



आधार पॅन लिंक करण्याची आजची शेवटची तारीख असताना मध्यरात्रीपर्यंत प्रयत्न करत रहावे लागणार आहेत. आयकर विभागाने 2019 मध्ये पहिल्यांदा आधार-पॅन जोडणे बंधनकारक केले होते. यानंतर वारंवार याची डेडलाईन वाढविण्यात येत होती. दोन वर्षे देऊनही अद्याप करोडो लोकांनी लिंक केलेले नाहीय. 

Web Title: Aadhaar-PAN Linking: income tax website crashed on last day; Link Aadhaar link not working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.