पान ४ वाहनमालकाने केली इन्सुरन्स कंपनीमध्ये तोडफोड
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:22+5:302015-04-24T00:55:22+5:30
संशयितास अटक : वीस हजारांचे नुकसान

पान ४ वाहनमालकाने केली इन्सुरन्स कंपनीमध्ये तोडफोड
स शयितास अटक : वीस हजारांचे नुकसानबार्देस : वाहन अपघाताबाबत इन्शुरन्स मिळत नसल्याच्या रागाने एका वाहनचालकाने म्हापसा येथील युनायटेड इंडियन इन्सुरन्स कार्यालयात तोडफोड केली. गुरुवारी दुपारी १२.१५ वा.च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी रवींद्र आर. धावणे याला अटक करून सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी २०१५ रोजी धावणे याच्या जीए ०३ पी ८२३० या टोयटा इनोव्हा वाहनाला अपघात झाला होता. त्याने इन्सुरन्स मिळावा यासाठी २० जानेवारीला युनायटेड इंडियन इन्सुरन्स कंपनीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, इन्सुरन्स कंपनीकडून चालढकल होत होती, असे त्याचे म्हणणे आहे. गुरुवारी घटना घडली त्या वेळी कंपनीने सर्व व्यवहार पूर्ण केले होते आणि त्याला फक्त व्हाउचरवर सही करायची होती. मात्र, रागाच्या भरात कंपनीचे व्यवस्थापक सुनील हुम्रस्कर यांच्या केबिनची काच, एक कॉम्प्युटर फोडून टाकला. यात कंपनीला २० हजार रुपयांचे नुकसान झाले. कंपनीने म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरिष राऊत देसाई करीत आहेत. (प्रतिनिधी) फोटो : म्हापसा येथील युनायटेड इंडियन इन्सुरन्स कार्यालयात संशयिताने फोडलेला कॉम्प्युटर. (प्रकाश धुमाळ) २३०४-एमएपी-०५, ०६