पान 4- रेवोडा सरपंचपदी अर्जुन कवठणकर बिनविरोध
By Admin | Updated: August 12, 2015 23:53 IST2015-08-12T23:53:59+5:302015-08-12T23:53:59+5:30
म्हापसा : रेवोडा पंचायतीच्या सरपंचपदी अर्जुन कवठणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नव्या सरपंचाची निवड करण्यासाठी बुधवारी (दि. 12) पंचायतीची खास बैठक बोलावण्यात आली होती. पंचायतीच्या निवडणुकीनंतर पंचायतीवर निवडण्यात आलेले ते चौथे सरपंच आहेत.

पान 4- रेवोडा सरपंचपदी अर्जुन कवठणकर बिनविरोध
म हापसा : रेवोडा पंचायतीच्या सरपंचपदी अर्जुन कवठणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नव्या सरपंचाची निवड करण्यासाठी बुधवारी (दि. 12) पंचायतीची खास बैठक बोलावण्यात आली होती. पंचायतीच्या निवडणुकीनंतर पंचायतीवर निवडण्यात आलेले ते चौथे सरपंच आहेत. मागील सरपंच वल्लभ फडते यांनी पदाचा राजीनामा दि. 22 जुलै रोजी पंचायत संचालनालयाला सादर केला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. बुधवारी पंचायत कार्यालयात सकाळी 10.30 वाजता बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीला निरीक्षक म्हणून गटविकास कार्यालयातील अधिकारी कृष्णा गडेकर उपस्थित होते. सात पंचसदस्य असलेल्या पंचायतीच्या नव्या सरपंचाची निवड करण्यासाठी सहा पंचसदस्य उपस्थित होते. तर एक पंच आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. अर्जुन कवठणकर यांचे नाव पंच सदानंद बागकर यांनी सुचविले. तर त्याला सतीश हरमलकर यांनी अनुमोदन दिले. कवठणकर यांनी सांगितले की, मागील तीन सरपंचांनी केलेली विकासकामे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच थिवी मतदारसंघातील आमदार किरण कांदोळकर यांच्या सहकार्याने नवीन विकासकामे हाती घेण्यात येतील. (खास प्रतिनिधी) फोटो- निवडून आलेले सरपंच अर्जुन कवठणकर यांच्यासह इतर पंच. (1208-एमएपी-04)