पान 2 - म्हापशासाठी सत्ताधारी गटाचे पॅनल चतुर्थीपूर्वी जाहीर : उपमुख्यमंत्री

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:37+5:302015-09-03T23:05:37+5:30

म्हापसा : पालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर म्हापसा पालिकेसाठी आपले पॅनल चतुर्थीपूर्वी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिली.

Pan-2: Official table for the Map of Manchaparthi announced before Chaturthi: Deputy Chief Minister | पान 2 - म्हापशासाठी सत्ताधारी गटाचे पॅनल चतुर्थीपूर्वी जाहीर : उपमुख्यमंत्री

पान 2 - म्हापशासाठी सत्ताधारी गटाचे पॅनल चतुर्थीपूर्वी जाहीर : उपमुख्यमंत्री

हापसा : पालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर म्हापसा पालिकेसाठी आपले पॅनल चतुर्थीपूर्वी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिली.
पालिका निवडणुकीसाठी आरक्षण पुढील काही दिवसांत अध्यादेश काढून जाहीर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पालिका प्रशासनाकडून आरक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे ते या वेळी म्हणाले. ते झाल्यानंतर सरकार आरक्षण अधिसूचित करणार असल्याची माहिती या वेळी दिली.
म्हापसा पालिकेच्या प्रभागांची संख्या सरकारने 15 वरून 20 केली असून सध्या अस्तित्वात असलेल्या 15 नगरसेवकांतील डिसोझा यांच्याकडे 8 नगरसेवक आहेत. यातील काही नगरसेवकांना सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सुतोवाच त्यांनी या वेळी केले. मात्र, जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. निवडणुका 20 प्रभागांसाठी होणार असल्याने सध्या तरी 12 नवीन उमेदवार असतील हे मात्र निश्चित असल्याचे ते या वेळी म्हणाले.
दरम्यान, 25 ऑक्टोबर रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम अधिसूचित करताना 1 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. तालुक्यातील उपजिल्हाधिकारी हे तालुक्यासाठी निर्वाचन अधिकार्‍याचे काम पाहतील तर बार्देसच्या मामलेदारांची म्हापसा पालिकेसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी पेडे येथील क्रीडा संकुलात होणार आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Pan-2: Official table for the Map of Manchaparthi announced before Chaturthi: Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.