पान २- म्हादई प्रश्नी ११ फेब्रुवारीला सुनावणी गोवा सरकारची जय्यत तयारी कर्नाटकाकडून मोर्चे बांधणी

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:06+5:302014-12-23T00:04:06+5:30

फोटो : म्हादईच्या लढाईसाठी गोव्यातर्फे जोरदार तयारी चालू आहे. (छाया : विशांत वझे)

Pan-2: Mhadei question prepared for Goa's war on 11th February | पान २- म्हादई प्रश्नी ११ फेब्रुवारीला सुनावणी गोवा सरकारची जय्यत तयारी कर्नाटकाकडून मोर्चे बांधणी

पान २- म्हादई प्रश्नी ११ फेब्रुवारीला सुनावणी गोवा सरकारची जय्यत तयारी कर्नाटकाकडून मोर्चे बांधणी

टो : म्हादईच्या लढाईसाठी गोव्यातर्फे जोरदार तयारी चालू आहे. (छाया : विशांत वझे)
म्हादईप्रश्नी ११ फेब्रुवारीला सुनावणी
गोव्याची जय्यत तयारी : कर्नाटकाकडून मोर्चेबांधणी
डिचोली : गोव्याचे पाणी पळवण्याची कर्नाटकाची योजना कार्यान्वित करण्याला गोवा सरकारच्या आक्रमक धोरणामुळे सध्या ब्रेक लागून काम बंद असले तरी कर्नाटकाने सर्व विरोध झुगारून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. बेळगाव येथे चालू असलेल्या कर्नाटकाच्या अधिवेशनात कळसा भंडुरा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याबाबत एकमत झाले आहे.
दरम्यान, म्हादईप्रश्नी जललवादासमोर ११ फेब्रुवारीला सुनावणी होत असून गोवा सरकारतर्फे सर्व पातळीवर कर्नाटकाला रोखण्यासाठी पुरावे व इतर कागदपत्राबरोबरच आवश्यक गोष्टीची सरकारने तयारी चालवल्याचे मुख्य अभियंता संदीप नाकडर्णी यांनी सांगितले.
कर्नाटकाने ७.४६ टीएमसी पाणी वळवण्यासाठी २००६ सालापासून कळसा प्रकल्पाचे काम सुरू केलेले आहे. आंब्याचो व्हाळ ते माउली मंदिर परिसरात खोदकाम व बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. गोव्याचा सक्त विरोध डावलून कर्नाटकाने काम चालू ठेवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तीव्र आक्षेप घेताना म्हादई जललवादाकडे कर्नाटकाबाबत तक्रार नोंदवून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.
काम थांबवण्यात यश
गोव्याचे ॲडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी मागील सुनावणीच्या वेळी गोव्याची बाजू भक्कमपणे मांडताना बांध घालून मलप्रभेत जाणारे पाणी अडवण्यात यश मिळाले होते. त्यानंतर कळसाच्या ठिकाणी चाललेले काम थांबवून सर्व भराव टाकून पुरवण्यात यश आले होते. गोव्याबाबत ही बाब समाधानाची पातळी जात आहे. दरवर्षी कर्नाटक निरावरी निगमतर्फे पावसाळ्यात बंद ठेवलेले काम पावसाळ्यानंतर प्रथमच या वर्षी अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.
सध्या काम बंद असले तरी कणकुंबीच्या नैसर्गिक जलस्रोतांवर आजपर्यंत बांधलेल्या कामाचा परिणाम जाणवलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण गावडे यांच्या मते काम बंद असले तरी कणकुंबी गावाला पर्यावरणीय अनेक प्रश्न निर्माण झाला असून माउली मंदिरासाठी बरीच समस्या निर्माण झाल्याचे सांगितले.
सर्वशक्तीनिशी लढू : मुख्यमंत्री
गोव्याच्या जीवनदायिनीचे रक्षण करण्याबाबत गोवा सरकारने कडक पावले उचलली असून आम्हाला प्राथमिक यश मिळाले आहे. फेब्रुवारीत होणार्‍या सुनावणीची तयारी केलेली असून आपले अधिकारी व कायदेतज्ज्ञ कर्नाटकाला कात्रीत पकडण्यासाठी तयारीत आहेत. गोव्याच्या हिताला आपले प्राधान्य असून पाण्याच्या रक्षणासाठी सर्व ती खबरदारी घेण्यास प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
ॲड. नाडकर्णीही प्रयत्नशील
म्हादईची न्यायालयीन लढाई हाताळणारे ॲड. आत्माराम नाडकर्णी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गोव्याची बाजू मांडताना प्राथमिक यश दिलेले आहे. पुढील लढाईही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढली जाणार असल्याने जय्यत तयारी करून गोव्याचे हित जपण्याला प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे.
जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी व त्यांचे सहकारी म्हादईप्रश्नी प्रामाणिकपणे लढा देत असून राज्याचे हित जपण्यासाठी आजपर्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हा विषय हाताळलेला आहे.
आम्ही आपल्या परीने सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहोत. गोव्याची बाजू भक्कम व्हावी यासाठी सर्व प्रकारे पुरावे गोळा करणे व इतर दस्तवेजाबरोबरच इतर तांत्रिक मुद्देही मांडण्याची तयारी करण्यात आल्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांनी सांगितले.
लढाई तीव्र करणार
म्हादईप्रश्नी गोव्याने चांगली लढाई दिली आहे. सध्या कर्नाटक एक पाऊल मागे आलेले असले तरी त्यांची चाल मोठी आहे. त्यामुळे हा लढा तीव्र करताना सावधगिरीने पावले उचलून गोव्याचे हित जपण्यासाठी सर्व ती तयारी चालू असल्याचे जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.

Web Title: Pan-2: Mhadei question prepared for Goa's war on 11th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.