पान १ - सेन्सेक्स @ २३,५५१ !
By Admin | Updated: May 12, 2014 21:35 IST2014-05-12T21:35:06+5:302014-05-12T21:35:06+5:30

पान १ - सेन्सेक्स @ २३,५५१ !
>सेन्सेक्स @ २३,५५१ !मुंबई - येत्या १६ मे रोजी जाहीर होणार्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्थिर सरकार येण्याच्या शक्यतेने आज (सोमवार) बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा विक्रम केला. निफ्टीने पहिल्यांदा ७,००० अंशांचा टप्पा पार केला, तर सेन्सेक्स २३,५५१ वर पोहोचला. सेन्सेक्समध्ये ५५७ अंशांची तर निफ्टीमध्ये १५५ अंशांची वाढ झाली आहे. गुंतवणुकदारांनी प्रामुख्याने बँक, तेल, ऊर्जा, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, वाहन कंपन्यांना पसंती दिली. आज संध्याकाळी विविध एक्झिट पोलनी एनडीएप्रणित स्थिर सरकारचा अंदाज वर्तविल्याने मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी या दोन्हींमध्ये आणखी तेजी निर्माण होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. (प्रतिनिधी)