पालखी-कावड सोहळ्याचे आयोजन २५ ऑगस्टलाच! मंदिर व्यवस्थापनाची पत्रकार परिषदेत माहिती
By Admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:54+5:302014-08-16T22:24:54+5:30
अकोला: राज्यातील सर्वात मोठ्या पालखी व कावड यात्रेचे आयोजन २५ ऑगस्ट रोजीच होणार असून, शिवभक्तांनी जय्यत तयारी करण्याचे आवाहन राजेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी केले. हा उत्सव नेमक्या कोणत्या सोमवारी, या मुद्यावर शिवभक्तांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पालखी-कावड सोहळ्याचे आयोजन २५ ऑगस्टलाच! मंदिर व्यवस्थापनाची पत्रकार परिषदेत माहिती
अ ोला: राज्यातील सर्वात मोठ्या पालखी व कावड यात्रेचे आयोजन २५ ऑगस्ट रोजीच होणार असून, शिवभक्तांनी जय्यत तयारी करण्याचे आवाहन राजेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी केले. हा उत्सव नेमक्या कोणत्या सोमवारी, या मुद्यावर शिवभक्तांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या पिंडीला गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या जलाने जलाभिषेक करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेकदा श्रावण महिन्यात चार सोमवार येत असल्यामुळे शेवटच्या सोमवारी पालखी व कावड उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा शिवभक्तांना राजेश्वराची पूजा-अर्चना करण्यासाठी पाच सोमवार मिळाले. शेवटच्या पाचव्या सोमवारी (२५ ऑगस्ट) पोळा सणसुद्धा असून, याच दिवशी पालखी व कावड सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी दिली. येत्या १९ ऑगस्ट पासून पालखीच्या नोंदणीला सुरुवात केली जाईल. पालखी उत्सवानंतर श्री जागृतेश्वर मंदिरात १ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे तर ४ सप्टेंबर रोजी लहान मुलांसाठी भंडारा आयोजित केला जाणार असल्याची माहिती सावजी यांनी यावेळी दिली.