शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 14:25 IST

Paliament Winter Session 2024 : बैठकीत काँग्रेसने अदानी आणि मणिपूर प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली.

Paliament Winter Session 2024 : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर लागल्या आहेत. उद्या, म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 विधेयकांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे हे अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, अधिवेशनापूर्वी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय काँग्रेस नेते जयराम रमेश आणि गौरव गोगोई, टी शिवा, हरसिमरत कौर बादल आणि अनुप्रिया पटेल उपस्थित होते.

बैठकीत काँग्रेसने अदानी आणि मणिपूर प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली. याशिवाय उत्तर भारतातील प्रदूषण आणि रेल्वे अपघातांवरही चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने अदानी समूहावरील लाचखोरीच्या आरोपांवर संसदेत चर्चा करण्याचे सरकारला आवाहन केले. सोमवारी संसदेच्या बैठकीत हा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित व्हावा, अशी त्यांच्या पक्षाची इच्छा आहे. 

वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे अधिवेशन वादळी ठरणार प्रलंबित विधेयकांमध्ये वक्फ विधेयकाचाही समावेश आहे. या अधिवेशनासाठी सरकारने संयुक्त संसदीय समिती स्थापन केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या समितीला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. समितीचा अहवाल सादर करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी समितीचे विरोधी सदस्य करत आहेत. तर, समितीचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार जगदंबिका पाल समितीच्या बैठकीत व्यत्यय आणत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसGautam Adaniगौतम अदानीManipur Violenceमणिपूर हिंसाचार