पालघर हत्याकांड प्रकरण : पोलिसांची चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 01:16 AM2020-07-18T01:16:55+5:302020-07-18T01:17:27+5:30

यापूर्वी, ११ जून रोजी याप्रकरणी सीबीआय व एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी करणा-या दोन याचिकांवर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागविले होते.

Palghar murder case: Petition seeking police inquiry rejected | पालघर हत्याकांड प्रकरण : पोलिसांची चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली

पालघर हत्याकांड प्रकरण : पोलिसांची चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली

Next

नवी दिल्ली : पालघर येथे एप्रिलमध्ये दोन साधूंसह तीन जणांच्या जमावाकडून झालेल्या हत्येप्रकरणी न्यायालयीन चौकशी आणि पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी करणाऱ्या जय कृष्ण सिंह यांच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
न्या. अशोक भूषण, न्या. संजय किशन कौल आणि न्या. एम.आर. शाह यांच्या पीठाने सांगितले की, याची न्यायालयाने आधीच दखल घेतलेली आहे.
यापूर्वी, ११ जून रोजी याप्रकरणी सीबीआय व एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी करणा-या दोन याचिकांवर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागविले होते.

याचिकेत काय केली होती मागणी?
- सिंह यांनी पालघरप्रकरणी घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
- सीसीटीव्हीत या साधूंच्या आजूबाजूला दिसणाºया पोलीस कर्मचाºयाविरुद्धही कारवाईची मागणी यात करण्यात आली आहे.
- सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Palghar murder case: Petition seeking police inquiry rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.