शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पलानीस्वामी सरकार अडचणीत? दिनकरन समर्थक आमदारांनी पाठिंबा काढला, 17 आमदारांची पुदुच्चेरीला रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 17:50 IST

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतचे नवनवे अंक सादर होत आहेत. माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे गट काल एकत्र आल्यानंतर आता दिनकरन यांचे समर्थक असलेल्या 19 आमदारांनी पलानीस्वामी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

चेन्नई, दि. 22 - माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतचे नवनवे अंक सादर होत आहेत. माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे गट काल एकत्र आल्यानंतर आता दिनकरन यांचे समर्थक असलेल्या 19 आमदारांनी पलानीस्वामी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच या आमदारांच्या गटामधील संभाव्य फूट टाळण्यासाठी त्यांना पुदुच्चेरीमधील रिसॉर्टवर पाठवण्यात आले आहे.  दरम्यान, 19 आमदारांनी पाठिंबा मागे घेतल्याने 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.  सध्या एआएडीएमकेच्या सगळ्या गटांचे मिळून 135 आमदार आहेत. मात्र संभाव्य फोडाफोडीमुळे पलानीस्वामी यांची खुर्ची डळमळीत झाली आहे.  दिनकरन समर्थक असलेल्या 17 आमदारांना पुदुच्चेरीमधील रिसॉर्टवर पाठवण्यात आले आहे. ज्याप्रमाणे गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आमदारांना कर्नाटकमध्ये हलवले होते. त्याचप्रमाणे दिनकरन यांच्या समर्थकांनी ही खबरदारी घेतली आहे. आता राज्यातील राजकारणाच्या वर्तमान स्थितीबाबत मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनिरसेल्वम पक्षाच्या मुख्यालयात चर्चा करत आहेत. राज्यातील राजकारणाचे बदलते गणित विचारात घेऊन त्वरित विधानसभेचे अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांनी पत्र लिहून केली आहे.  अधिक वाचासप्टेंबरमध्ये केंद्रात फेररचना? जनता दल .युनायटेड, अण्णा द्रमुक पक्षही सरकारात येणारअण्णा द्रमुकमध्ये मनोमिलन, पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रिपद तथा पक्षाचे समन्वयक पदआम्ही घुसलो तर भारतात अराजकता निर्माण होईल - चीनची धमकीदरम्यान,  अण्णा द्रमुकचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या गटांचे सोमवारी  विलीनीकरण झाले होते. पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांना पदावरून व पक्षातून दूर करण्याबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे. समझोत्याचा भाग म्हणून पक्षाचे समन्वयक म्हणून पनीरसेल्वम यांना नेमण्यात आले असून, मुख्यमंत्री उपसमन्वयक असतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.   माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाचा ताबा घेतल्यामुळे आणि पनीरसेल्वम यांना दूर करून पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली होती. पण आता  शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना पक्षात कोणतेही स्थान असणार नाही.     पनिसेल्वम आणि पलानीस्वामी यांचे गट एकत्र यावेत, यासाठी भाजपाने खूपच रस दाखवला होता. त्यामुळे या एकीकरणाचा भाजपाला अधिक आनंद झाला आहे. विलीनीकरण आजच व्हावे, यासाठीही भाजपाने दबाव आणला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी चेन्नईला जाण्यापूर्वी हे गट एकत्र यावेत, अशी भाजपाची इच्छा होती.तसेच पनीरसेल्वम व पलानीस्वामी यांनी एकूण सहा वेळा पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. आजही दोन्ही गट एकत्र आल्यावर मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तामिळनाडूमध्ये एकत्रित अण्णा द्रमुकशी समझोता करून ताकद वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपा