शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

दिवाळीत दहशतवादी हल्ले करण्याची पाकिस्तानची तयारी, झाकीर मुसासहित 12 दहशतवादी भारतात घुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 19:46 IST

दिवाळीला भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट पाकिस्तान आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

नवी दिल्ली - दिवाळीला भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट पाकिस्तान आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सुत्रांकडून मिळाली आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू काश्मीरमधील सीमारेषा परिसरात गुलमर्ग येथून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. झाकीर मुसासहित 12 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असल्याची सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. लष्करी कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्याचा आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा कट आखण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी दोन दिवसांपुर्वी नियंत्रण सीमेवर मीटिंग केली. यावेळी भारतावर हल्ल्याचा कट आखण्यात आला. 

झाकीर मूसा हा जम्मू काश्मीरच्या अल-कायदा युनिटचा प्रमुख आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर मुसाने अल-कायदाशी संबंधित जज्बात-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेच्या अन्य चौघांसोबत मीटिंग केली. बडगाम जिल्ह्यात ही मीटिंग झाली. यावेळी त्याने दहशतवाद्यांनी मोबाइलचे सीम कार्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट दिल्याने सुरक्षा यंत्रण सज्ज झाल्या असून, देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

23 वर्षीय झाकीर मूसा याने काही महिन्यांपुर्वी हिजबूल मुजाहिद्दीनची साथ सोडत 'गजवा-ए-हिंद'मध्ये (अल कायदाची दहशतवादी संघटना) सामील झाला होता. आपण दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याचा दावा तो करत आला आहे.  झाकीर मुसाने हिजबूलची साथ सोडताना सांगितलं होतं की, 'फुटीरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्स काश्मीरला राजकीय समस्सा सांगत सामान्य लोकांना फासावर लटकवत आहे'. 

याचवर्षी जुलै महिन्यात अल कायदाने झाकीर मुसा 'गजवा-ए-हिंद'चा प्रमुख असेल अशी घोषणा केली होती. काश्मीरला मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी जिहादचा झेंडा फडकावणं गरजेचं आहे. यासाठी झाकीर मुसाकडे सुत्रं सोपवण्यात आली आहेत असं अल कायदाने सांगितलं होतं. 

बकरी ईदच्या आधी झाकीर मुसाने भारताला गोभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूपासून मुक्त करणार असल्याची धमकी दिली होती. बकरी-ईदच्या आधी झाकीर मुसाने 10 मिनिटांचा ऑडिओ मेसेज जारी करत ही धमकी दिली होती.  'गोभक्त नरेंद्र मोदी राजकारण आणि डिप्लोमसी करत लोक जमा करु शकतात, मात्र ते आम्हाला थांबवू शकत नाहीत. आम्ही भारतात इस्लामचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही', असं झाकीर मुसा बोलला होता. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिरdiwaliदिवाळी