पाकच्या कुरापती थांबेना, आता चक्क कबुतराद्वारे धमकी
By Admin | Updated: October 2, 2016 21:49 IST2016-10-02T21:49:50+5:302016-10-02T21:49:50+5:30
पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीत. फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकीदेण्याचं प्रकरण ताजं असताना आता चक्क कबुतराद्वारे

पाकच्या कुरापती थांबेना, आता चक्क कबुतराद्वारे धमकी
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि.2- भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान चांगलंच सैरभैर झालं आहे. पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीत. फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकीदेण्याचं प्रकरण ताजं असताना आता चक्क कबुतराद्वारे धमकी देण्यात आली आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये बीएसएफच्या 191 बटालीयनने एका कबुतराला पकडलं असून त्याच्या पायात उर्दू भाषेत लिहीलेलं एक पत्र सापडलं आहे.
या पत्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाने संदेश लिहीण्यात आला असून, 'मोदीजी आम्हाला 1971 सारखं कमकुवत समजू नका आता आम्ही प्रत्येकजण तुमच्याविरोधात युद्धासाठी सज्ज आहोत' असं लिहीण्यात आलं आहे.
यापुर्वी काल सांयकाळी फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकी देण्यात आली होती. पंजाबमधील दीनानगर जवळील घेस्ल गावाजवळ एक फुगा आढळला होता. या फुग्यामध्ये एक पत्र होतं त्या मध्ये मोदीजी, अयुबी की तलवारे अभी हमारे पास हैं. इस्लाम जिंदाबाद' असा मजकूर त्या कागदावर लिहीला होता.