गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी सुरणकोट येथील शिवमंदिरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने उघड केले आहे. एसआयएने अब्दुल अजीज आणि नजीर अहमद उर्फ नझीरू उर्फ अली खान रा. हरी सफेदा सुरनकोट जिल्हा पूंछ यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. नझीरकडून मिळालेल्या सूचनांवरून अब्दुल अजीजने हा ग्रेनेड हल्ला केल्याचे तपासात उघड झाले आहे.
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
नझीर सध्या पाकिस्तानात लपला आहे आणि अब्दुल फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. नझीर २००१ मध्ये पाकिस्तानला गेला होता, तिथे तो बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनमध्ये सामील झाला, नंतर जम्मू काश्मीर गझनवी फोर्स मध्ये सामील झाला.
पाकिस्तानमध्ये अब्दुल अजीजसोबत संपर्कात
२०२२ च्या अखेरीस, नझीरने पाकिस्तानी नंबर वापरून एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्लिकेशन्सद्वारे त्याचा नातेवाईक अब्दुल अजीजशी संपर्क केला. त्याने अझीझला कट्टरपंथी बनवले आणि त्याला एचएम आणि जेकेजीएफमध्ये भरती केले. दहशतवादी संघटनेचा अजेंडा आणि विचारसरणी पुढे नेण्यासाठी त्याला पूंछ जिल्ह्यात ग्रेनेड हल्ले करण्यास सांगण्यात आले होते, असं निवेदनात म्हटले आहे.
नाझीरने त्याला ग्रेनेडही पुरवले. जम्मू आणि काश्मीर अस्थिर करण्यासाठी हिजबुल मुजाहिदीनने एक मोठा कट रचल्याचे तपासात उघड झाले. या कृत्याचा उद्देश दहशत पसरवणे, सांप्रदायिक हिंसाचार भडकवणे आणि सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग करणे हा होता, असंही निवेदनात म्हटले आहे.