शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान तोंडावर आपटलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 14:09 IST

काश्मीरच्या प्रश्नावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे.

नवी दिल्ली- काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अभिनंदन करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यांचा हा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानंच फेटाळून लावला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पत्रातून मोदींनी इम्रान खान यांचं अभिनंदन केलं, तसेच दोन देशांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी, असं पत्रात नमूद असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर भारताबरोबर सकारात्मक संबंध ठेवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली होती. पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचाही भाषणात उल्लेख केला होता. शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवल्यास पाकिस्तानात शांती नांदण्यास मदत होणार असल्याचंही इम्रान खान म्हणाले होते. इम्रान खान यांनी गेल्या शनिवारी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेल्या इम्रान यांनी उर्दूतून शपथ घेतली. काँग्रेस नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित होते.

जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, पक्षाकडे बहुमत नव्हते. शुक्रवारी सहयोगी पक्षांच्या मदतीने या पक्षाने आपले मताधिक्य संसदेत दाखवले. यावेळी इम्रान खान यांना 176 मते मिळाली तर पाकिस्तान मुस्लीम लीगचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना 96 मते मिळाली.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदी