वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांची दगडफेक
By Admin | Updated: October 2, 2016 22:14 IST2016-10-02T22:14:56+5:302016-10-02T22:14:56+5:30
वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी नागरिकांनी भारताच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी भारताविरोधात घोषणाबाजी

वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांची दगडफेक
>ऑनलाइऩ लोकमत
नवी दिल्ली, दि. 2- वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी नागरिकांनी भारताच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी भारताविरोधात घोषणाबाजीही केली.
सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताने बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द केलं होतं. त्यामुळे या कार्यक्रमावेळी भारतीय नागरिकांची उपस्थिती नव्हती, मात्र पाकिस्तानी नागरिक यावेळी उपस्थित होते. संध्याकाळच्या वेळी झालेल्या या कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांनी भारताविरोधात घोषणाबाजी केली तसेच भारताच्या दिशेने दगडफेक केली. घटनेनंतर बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सना बैठक घेण्यास सांगितलं आहे.