न्यव्या वर्षापूर्वी सीमा हैदरनं दिली Good News; प्रेग्नंसी किट दाखवत शेअर केला संपूर्ण Video!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:33 IST2024-12-23T18:30:41+5:302024-12-23T18:33:18+5:30
या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रेग्नंसी टेस्टचा रिझल्ट दाखवत ही माहिती देत आहे...

न्यव्या वर्षापूर्वी सीमा हैदरनं दिली Good News; प्रेग्नंसी किट दाखवत शेअर केला संपूर्ण Video!
आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर पाचव्यांदा गरोदर आहे. सीमा हैदरच्या प्रेग्नेंसीची बातमी एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रेग्नंसी टेस्टचा रिझल्ट दाखवत ही माहिती देत आहे. सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडातील सचिन मीना हे दोघे मोबाईलवरील PUBG या ऑनलाइन गेमच्या माध्यमाने एकमेकांच्या संपर्कात आले. आता सीमा हैदर सचिन आणि तिच्या चार मुलांसह ग्रेटर नोएडामध्ये राहत असून तिच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.
संबंधित व्हायरल व्हिडीओमध्ये सीमा हैदर गर्भवती असल्याची पुष्टी करणारी टेस्ट दाखवत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ती तिला मळमळ आणि चक्कर येत असल्याचे सांगते. यानंतर ती प्रेग्नंसी टेस्ट करते. चाचणी पॉझिटिव्ह येते. यानंतर ती सचिनला रूममध्ये बोलावते आणि सरप्राईज देते. यानंतर सचिन प्रेग्नंसी किट बघून अत्यंत आनंदी होतो आणि सीमाला मिठी मारतो.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -
व्हिडिओमध्ये, सीमा सचिनला सांगते की, तो पुन्हा बाप होणार आहे. या गुड न्यूजनंतर दोघेही आनंद व्यक्त करतात. यात सीमाने ती सात महिन्यांची गरोदर असल्याचेही सांगितले आहे. सीमाने हिंदू धर्म स्वीकारून नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरात सचिन मीनासोबत लग्न केले. भारतात आल्यानंतर त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाचे फरहान अलीचे नाव राज ठेवण्यात आले आणि त्यांच्या तीन मुली - फरवा (6 वर्षे), फरीहा बटूल (4 वर्षे) आणि फरहा - यांचे नाव प्रियांका, मुन्नी आणि परी असे ठेवण्यात आले.