शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:11 IST

सध्या विशाल यादवची जयपूरमध्ये चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा त्याच्याकडून आणखी माहिती जमा करत आहेत.

पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. या मोहिमेत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. एकीकडे भारतीय जवान देशाच्या रक्षणासाठी सीमेवर शत्रूशी लढत होते त्याचवेळी दिल्लीत बसलेला एक युवक भारताशी गद्दारी करत होता. या युवकाचे नाव विशाल यादव असून तो नौदल भवनात बसून ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला माहिती देत होता. 

बुधवारी विशाल यादव याला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाने अटक केली. तो हरियाणातील रहिवासी आहे. नौदल भवनात डायरेक्टरेट ऑफ डॉकयार्डमध्ये कार्यरत विशाल यादव सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या सातत्याने संपर्कात होता. या महिलेचे नाव प्रिया शर्मा असल्याचे सांगितले जाते. विशालला पैशाचे आमिष दाखवून नौदल भवनातून देशाची धोरणात्मक माहिती देण्यासाठी त्याच्या मागे लागली होती. आरोपी विशाल यादव याला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. त्यामुळे आर्थिक गरज भागवण्यासाठी त्याने देशाशी गद्दारी करायलाही मागेपुढे पाहिले नाही. गुप्तहेर महिला विशालकडून माहिती घेत त्याच्या क्रिप्टोकरेंसी अकाऊंटमध्ये यूएसडीटी आणि थेट बँक खात्यात रक्कम पाठवत होती. 

त्याशिवाय तपासात विशालच्या मोबाईलमधूनही अनेक खुलासे समोर आले. त्याच्या चॅट आणि कागदपत्रातून त्याने ऑपरेशन सिंदूरवेळी नौदल आणि अन्य गोपनीय माहिती पाकिस्तानी महिला गुप्तहेराला दिल्याचे तपासात उघड झाले. सध्या विशाल यादवची जयपूरमध्ये चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा त्याच्याकडून आणखी माहिती जमा करत आहेत. पहलगाम हल्ल्यापासून संशयित पाकिस्तानी गुप्तहेरांचे नेटवर्क शोधण्याचे काम भारतीय तपास यंत्रणा करत आहेत. अलीकडच्या काळात सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसोबत संबंध ठेवल्याप्रकरणी अनेकांना अटक केली आहे. राजस्थानातून शकूर खान नावाच्या सरकारी अधिकाऱ्यालाही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करत अटक केली. सर्वात आधी हरियाणातील ज्योती मल्होत्रा हिला पकडण्यात आले. 

दरम्यान, पंजाब पोलिसांनी २२ जूनला ISI साठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक केली होती. गुरप्रीत सिंग उर्फ गोपी फौजी आणि साहिल मशीहा अशी त्यांची नावे होती. गुप्तचर माहितीनुसार पोलिसांनी या दोघांना अटक केली. गुरप्रीत २०१६ साली सैन्यात होता आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI एजेंट राणा जावेदच्या तो संपर्कात असायचा. भारतीय सैन्याची ठिकाणे आणि सैन्य कारवाईबाबत तो ISI ला माहिती पुरवत होता. गुरप्रीत सिंगचे ISI एजेंटशी संबंध होते. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तो संवेदनशील माहिती शेअर करत होता. या प्रकरणी मुख्य हँडलर राणा जावेद होता. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान