पाकिस्तानच्या गोळीबारात सैनिक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 04:29 IST2018-07-15T04:29:19+5:302018-07-15T04:29:31+5:30

राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाला.

Pakistani soldiers injured in firing | पाकिस्तानच्या गोळीबारात सैनिक जखमी

पाकिस्तानच्या गोळीबारात सैनिक जखमी

जम्मू : राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. हा सैनिक अखनूर सेक्टरमध्ये खौर भागात चौकीवर तैनात होता. या सैनिकाला शरीराच्या वरच्या भागात गोळी लागली आहे.
प्राथमिक उपचारानंतर उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये या सैनिकाला हलविण्यात आले आहे. नियंत्रण रेषेवर या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये ७ जुलै रोजी पाकिस्तानच्या गोळीबारात सैन्याचा एक जवान जखमी झाला होता.
गेल्या वर्षात काश्मिरात घुसखोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या भागात नागरी वस्त्यांवरही पाकिस्तानकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वृत्तसंस्था)
> १,२५0 वेळा उल्लंघन
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा
आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर यावर्षी १२५० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. यात २४ सुरक्षा रक्षक शहीद झाले. तर, २८ स्थानिक रहिवासी मारले गेले आहेत. यात शेकडो लोक जखमी झाले आहेत.

Web Title: Pakistani soldiers injured in firing