शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांचा पंतप्रधान मोदींना फोन; निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 20:16 IST

पुलवामातील हल्ला, एअर स्ट्राइकनंतर पहिल्यांदाच दोन पंतप्रधानांमध्ये संवाद

इस्लामाबाद: लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फोनवरुन अभिनंदन केलं. दोन्ही देश जनतेच्या भल्यासाठी काम करतील, अशी आशा खान यांनी व्यक्त केली. भारतीय उपखंडाच्या समृद्धासाठी हिंसामुक्त आणि दहशतवादमुक्त वातावरण आवश्यक असल्याचं मोदींनी खान यांना सांगितलं. फेब्रुवारीत पुलवामात झालेला हल्ला, त्यानंतर भारतानं केलेला एअर स्ट्राइक या घटनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी प्रथमच फोनवरुन संवाद साधला.इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना फोन केल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली. 'पंतप्रधानांनी (इम्रान खान) आज मोदींशी संवाद साधला. त्यांच्या पक्षानं निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं. दोन्ही देशांमधील लोकांच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली,' असं फैसल यांनी ट्विट करुन सांगितलं. दक्षिण आशियातील शांतता, विकास आणि समृद्धीसाठी मोदींसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं इम्रान यांनी मोदींना सांगितल्याची माहितीदेखील फैसल यांनी ट्विटमधून दिली. इम्रान खान यांनी मोदींचं फोनवरुन अभिनंदन केल्याच्या वृत्ताला भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दुजोरा दिला. 'पंतप्रधान मोदींना आज पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी फोन केला होता. खान यांनी मोदींचं निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केलं. यावेळी मोदींनी खान यांना गरिबीच्या समस्येशी लढण्याचा सल्ला दिला. आशिया खंडाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी दहशतवादमुक्त वातावरण गरजेचं आहे, असं मोदींनी खान यांना सांगितलं,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला