शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पाणबुडीवरूनही पाकिस्तानची घागर बुडाली; खोटं बोलून अब्रू घालवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:05 PM

भारतीय पाणबुडीला हुसकावून लावल्याचा पाकिस्तानी नौदलाचा दावा

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पाकिस्ताननं नवा दावा केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय पाणबुडीला हुसकावून लावल्याचा दावा पाकिस्तानी नौदलानं केला. त्यासाठी त्यांनी एक चित्रफितदेखील दाखवली. भारतीय पाणबुडी घुसखोरीच्या प्रयत्नात होत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं. भारतीय पाणबुडी पाकिस्तानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती, यात तथ्य नसल्याचं भारतीय संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलं. 'पाकिस्ताननं ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या ठिकाणचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मात्र त्यात तथ्य दिसत नाही. ज्या क्षेत्राला पाकिस्तान स्वत:चं सागरी क्षेत्र म्हणून घेतो आहे, तो भाग पाकिस्तानच्या सागरी हद्दीत येत नाही. तो भाग आंतरराष्ट्रीय सीमेच्या अंतर्गत येतो. त्यामुळे त्या भागात भारतीय पाणबुडीला अटकाव करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण पाकिस्तानला तो अधिकारच नाही,' असं संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलं. पाकिस्ताननं प्रसिद्ध केलेली चित्रफित चार मार्चची आहे. यामध्ये रात्री 8.35 ची वेळ दिसत आहे. पाकिस्तानी नौदलानं भारतीय पाणबुडीला मागे हटवण्यासाठी विशेष कौशल्याचा वापर केल्याचा दावा नौदलाच्या प्रवक्त्यानं केला. 'पाकिस्तानी नौदलानं भारतीय पाणबुडीची घुसखोरी रोखली. पाकिस्तानचं धोरण शांततेचं असल्यानं पाणबुडीला लक्ष्य करण्यात आलं नाही,' असं म्हणत नौदल प्रवक्त्यानं सौहार्दाचा राग आळवला. पाणबुडीला रोखल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्ताननं भारताला थेट धमकीदेखील दिली. 'भारतानं या घटनेपासून धडा घ्यायला हवा. पाकिस्तानी नौदल आपल्या जलक्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी तत्पर आहे. कोणत्याही आक्रमक कारवाईला पूर्ण ताकदनिशी उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत,' असं पाकिस्तानी नौदलाचे प्रवक्ते म्हणाले. 2016 नंतर दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याचा दावादेखील त्यांनी केला. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला